Diwali Preparation 2024, 2 remedies to stop oil leakage from panati or diya
Diwali : पणत्यांमधून तेल गळतं? पणती विकत आणताच २ गोष्टी करा, पणत्यांमधून तेल झिरपणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 3:12 PM1 / 5दिवाळी हा दिव्यांचा उत्सव.. त्यामुळे दिवाळीत पणत्या, आकाशदिवे, लाईटिंग लावणे असं सगळं होणारच. पण घराला कितीही लाईटिंग लावून सजवलं तरीही पणतीच्या प्रकाशातून जे चैतन्य सगळीकडे पसरतं, त्याची तोड कशालाच नाही. अगदी महागडी लाईटिंग किंवा आतिषबाजीही पणतीच्या उजेडापुढे फिकीच आहे. 2 / 5पण पणत्या लावून सगळं घर उजळवून टाकताना एक अडचण मात्र होते. ती म्हणजे पणतीतून खूप तेल गळून जातं. त्यामुळे मग तिच्यात वारंवार तेल टाकावं लागतं.3 / 5यामुळे तेलही जास्त लागतं आणि शिवाय जमिनीवरही तेलाचे डाग पडतात. असं होऊ नये म्हणून दोन गोष्टी आवर्जून करा. यामुळे पणतीतून तेल गळणार नाही.4 / 5पहिली गोष्ट म्हणते बाजारातून विकत आणलेल्या पणत्या कधीही जशास तशा लावू नका. त्या पणत्या रात्रभर पाण्यात भिजत घाला. त्यानंतर काेरड्या फडक्याने पुसून थोडावेळ उन्हात वाळू द्या. त्या पुर्णपणे कोरड्या झाल्यानंतरच त्यांचा वापर सुरू करा. यामुळे पणत्या तेल पिणार नाहीत.5 / 5दुसरी गोष्ट म्हणजे पणत्यांवर ॲक्रेलिक रंग किंवा ऑईल पेंटचे कोटींग द्या. तुम्हाला तो पाहिजे तो रंग घेऊन पणती रंगवा. यामुळे पणत्यांमधली छिद्र पुर्णपणे बंद होतात आणि त्यांच्यातून तेल अजिबात झिरपत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications