शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali Rangoli 2024 : दिवाळीत मुलांसह काढा १० सोप्या कार्टून रांगोळ्या; मुलांनाही शिकवा रांगोळी काढण्यातली गंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 8:49 PM

1 / 8
आई -आजी किंवा बाबाही रांगोळी काढू लागले की मुलांना लूडबूड करायची असते, त्यांचा हट्ट आम्ही रांगोळी काढतो.
2 / 8
पण ठिपक्यांची किंवा नक्षीची रांगोळी येत नाही, त्यात रंगांची सांडलवंड करतात. त्यामुळे त्यांना आवडेल अशीच रांगोळी त्यांना शिकवली तर
3 / 8
मुलांना आवडतात कार्टून. पिकाचू, डोरेमॉन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम हे त्यांचे मित्रच. त्यांचंच चित्र रांगोळी म्हणून काढायला दिलं तर..
4 / 8
ही आयडिया या दिवाळीत वापरुन पाहा, अतिशय आनंदानं मुलंही या कार्टून रांगोळी काढतील.
5 / 8
मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टूनची आऊटलाइन काढून द्या. चित्र द्या. ते आनंदाने रंग भरतील.
6 / 8
त्यांना स्वत:च पूर्ण चित्र काढायचं असेल तरी चालेल वेळ लागेल पण मुलं रमतील या खेळात.
7 / 8
दिवाळीच्या सुटीत मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
8 / 8
दिवाळी म्हणजे केवळ खरेदी नाही तर आपण स्वत: काही करणं, प्रसन्न करणं आपला भवताल हे ही तितकेच महत्वाचे हे मुलांनाही कळेल.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrangoliरांगोळी