शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बघा साडी फोल्डरचे ७ हटके प्रकार, मावतील भरपूर साड्या - कव्हर टिकतील अनेक वर्षं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 4:50 PM

1 / 7
साड्या नीट राहण्यासाठी त्या एकावर एक रचण्यापेक्षा कव्हरमध्ये ठेवल्या तर कधीही जास्त चांगल्या राहतात. तसंच या कव्हरमधून त्या दिसतातही त्यामुळे घाईच्या वेळी सापडणे सोपे जाते (Diwali shopping different patterns of saree covers).
2 / 7
काठाच्या, डिझायनर, कॉटन, डेली यूजच्या अशा जास्त साड्या एकावेळी एकाठिकाणी ठेवायच्या असतील तर अशाप्रकारचा बॉक्स अतिशय फायदेशीर ठरतो.
3 / 7
टिपिकल साडी कव्हर किंवा बॉक्स नको असेल तर अशाप्रकारचे साडीचे हँगरही सध्या बाजारात उपलब्ध आहेत, ते फारच सोयीचे होतात.
4 / 7
पारंपरिक पद्धतीचे हे सा़डी बॉक्स सहसा आपल्याकडे असतातच. यामध्ये आपण डिझायनर किंवा सर्व प्रकारच्या साड्या अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो.
5 / 7
थोड्या वजनाने जड किंवा डिझायनर साड्या ठेवण्यासाठी हा पिशवीसारखा साडी बॉक्स उपयोगी ठरु शकतो. यात एकावेळी बऱ्याच साड्या मावतात आणि तो वापरायलाही सोपा असल्याने तुम्ही असा बॉक्स नक्की घेऊ शकता.
6 / 7
पुढून आणि वरुन दोन्ही पद्धतीने उघडता येणारा हा बॉक्स वापरणे सोपे असते. कपाटातही हा बॉक्स सहज ठेवता येतो आणि साडीची घडी मोडायचा प्रश्न उद्भवत नाही.
7 / 7
विविध रंगांचे आणि फ्लॅप पॅटर्नचे हे कव्हर साडीसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे. त्या त्या रंगाच्या साड्या ठेवण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठीही हे कव्हर उत्तम आहेत.
टॅग्स :ShoppingखरेदीDiwaliदिवाळी 2024saree drapingसाडी नेसणे