शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीसाठी शिवा लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाऊज; एक से एक स्लिव्हज डिजाईन्स पाहा-क्लासी लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 2:54 PM

1 / 16
दिवाळील घराघरातील महिला नवीन साडी घेतात. साडीवर नेहमी जुन्या, काकूबाई पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही लेटेस्ट् पॅटर्न्स ट्राय करू शकता. आजकाल पफस्लिव्ह, नेटचे स्लिव्हज, थ्री-फोर स्लिव्हज किंवा फूल स्लिव्हजच्या ब्लाऊजची फॅशन दिसून येते. (Blouse Hand Designs Latest)
2 / 16
कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारची ब्लाऊज डिजाईन शोभून दिसेल याचाही अंदाज तुम्हाला हे पॅटर्न बघून येईल. (Latest Stylish Blouse Sleeves Pattern Blouse sleeve ideas)
3 / 16
या दिवाळीला तुम्ही काठा पदराची किंवा ऑरगेंजा कोणतीही साडी घेणार असाल तरीही त्यावर सुट होतील असे लेटेस्ट स्लिव्हजचे डिजाईन्स पाहूया. (Blouse Hand Pattern New)
4 / 16
जर तुमचे दंड बारीक असतील तर तुम्ही स्लिव्हलेस किंवा शॉर्ट स्लिव्हजचे पॅटर्न ट्राय करू शकता. पण जर तुमचे दंड जाड असतील तर तुम्ही थ्री-फोर हॅण्ड्सचे ब्लाऊज शिवू शकता
5 / 16
ब्लाऊज शिजवाना जुन्या ब्लाऊजचे माप देणं टाळा. कारण जर तुमच्या शरीरात बदल झाले असतील ब्लाऊज लूज किंवा घट्ट होण्याची शक्यता असते. म्हणून अंगाचे माप देऊन व्यवस्थित ब्लाऊज शिवून घ्या.
6 / 16
काठापदराची किंवा सेमी सिल्क साडी असेल तर तुम्ही त्यावर पफ सिल्व्हजचं ब्लाऊज शिवू शकता. गळ्याच्या बाजूला खड्यांचे वर्क उठून दिसेल.
7 / 16
सेमी लॉन्ग ब्लाऊजमध्ये नेटचे पॅटर्नसुद्धा उठून दिसेल. त्यावर मोराचा किंवा नथीचा पॅच तुम्ही टेलर कडून लावून घेऊ शकता.
8 / 16
जर तुम्ही बोट नेक पॅटर्नचे ब्लाऊज शिवणार असाल तर त्यात प्लेन थ्री-फोर हॅण्ड्स सुंदर दिसतील.
9 / 16
ब्लाऊजसाठी चोकोनी डिजान्सचे वर्क सध्या खूप चर्चेत आहे. एखाद्या लग्नासाठी किंवा मोठ्या कार्यक्रमासासाठी तुम्ही हे हेवी वर्कचे ब्लाऊज वापरू शकता.
10 / 16
बटन्स आणि पतंगाप्रमाणे आकार असलेल्या ब्लाऊजमुळे सिंपल साडीलाही चांगला लूक येईल.
11 / 16
पफ स्लिव्ह बरोबर तुम्ही साडीच्या बॉर्डरनुसार मोठी बॉर्डर ब्लाऊजलाही जोडून घेऊ शकता.
12 / 16
बारीक दंडांना शॉर्ट स्लिव्हजचे ब्लाऊज उठून दिसते. गोल्डन किंवा सिल्वर मण्यांचे वर्क तुम्ही ब्लाऊजवर शिवून घेऊ शकता.
13 / 16
सिंपल ब्लाऊज शिवून त्यावर आकर्षक डिजाईन्सच्या लेस लावू शकता. २५० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला एकापेक्षा एक लेस उपलब्ध होतील.
14 / 16
तुम्ही बेल बॉटम ब्लाऊजसुद्धा स्टायलिश पद्धतीने शिवू शकता किंवा ब्लाऊज सिंपल ठेवून त्याला फ्रिलचे हात लावू शकता.
15 / 16
सिंपल बलून स्टाईल छोटे स्लिव्ह शिवून तुम्ही कॉन्ट्रान्स लेस निवडू शकता. जेणेकरून ब्लाऊज अधिकच उठून दिसेल.
16 / 16
बोट नेक ब्लाऊज आणि गळ्याच्या आणि हातांच्या टोकाला कापडाचे छोटे, छोटे बॉल्स शिवून घेऊ शकता.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022ShoppingखरेदीfashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स