Diwali Special Styling Tips What Type of Bangles will Suit Which Sarees Styling Tips
कोणत्या साडीवर कोणत्या बांगड्या छान दिसतात? ८ टिप्स, बांगड्या निवडा परफेक्ट- हात दिसतील सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:33 PM1 / 8दिवाळीच्या (Diwali 2024) दिवसांत मुलांना, बायकांना नवनवीन साड्या नेसायला फार आवडतं. या साड्यांवर सुट होईल असे मंगळसुत्र, हार, कानातले, बांगड्या यांची जमवाजमव सुरू असते. कोणत्या साडीवर कोणती ज्वलेरी सुट होईल याचं गणित पटकन कळत नाही.(What Type of Bangles will Suit Which Sarees)2 / 8कोणत्या प्रकारच्या साडीवर कोणत्या बांगड्या चांगल्या दिसतात. साडीनुसार बांगड्यांची निवड कशी करावी ते पाहूया.3 / 8ज्या रंगाची साडी आहे त्या रंगाच्या बांगड्या घालणं टाळा कारण यामुळे बांगड्या जराही उठून दिसणार नाहीत.4 / 8साडीच्या ब्लाऊजच्या रंग कोणता आहे ते पाहून ब्लाऊच्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर अधिक सुंदर दिसाल.5 / 8बांगड्यांवर अधिक प्रिट न घेता जितक्या प्लेन बांगड्या घ्याल तितकाच हात उठून दिसेल. आजबाजूला किंवा गोल्डन बांगड्या किंवा कडे घालू शकता.6 / 8साडीच्या रंगाला कॉन्ट्रास्ट बांगड्या घातल्या तर लूक अधिकच चांगला दिसतो. आजूबाजूला तुम्ही मोत्यांचे कडे घालू शकता.7 / 8काठापदराच्या कोणत्याही साडीवर तुम्ही हिरव्या बांगड्या घालू शकता. हिरव्या बांगड्यांनी जो लूक येतो तो इतर कोणत्याही बांगड्यांनी येत नाही.8 / 8जर तुम्ही खणाची किंवा चंदेरी काठाची साडी नेसली तर त्यावर ऑक्साईड बांगड्या घाला. आणखी वाचा Subscribe to Notifications