शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोथिंबीर खाता पण फायदे माहिती आहेत का? आहारामध्ये कोथिंबीर हवीच कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 10:00 IST

1 / 8
वरणामध्ये भाजीमध्ये मस्त ताजी कोथिंबीर घातली की त्याची चव छान लागते. वासही मस्त येतो. कोथिंबीरीची भाजीही केली जाते. तसेच विविध पदार्थ केले जातात. कोथिंबीर फक्त चव वाढवण्यासाठी आहारात घेत नाहीत. कोथिंबीर फार पौष्टिक असते.
2 / 8
कोथिंबीर हा अँण्टी ऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे शरीरासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरते. तसेच कोथिंबीरीमध्ये अनेक जीवनसत्वे असतात. इतरही गुणधर्म कमी जास्त प्रमाणात असतात.
3 / 8
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीर मदत करते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.
4 / 8
पचनासाठी कोथिंबीर अगदी उत्तम. पोटदुखी तसेच गॅसेसची समस्या कमी होते. पोट साफ होण्यासाठी कोथिंबीरीची मदत होते.
5 / 8
वजन कमी करण्यासाठी कोथिंबीरीचा ज्यूस पिणे फायद्याचे ठरते. कॅलेरीजचे प्रमाण कोथिंबीरीत अगदीच कमी असते. तसेच कोथिंबीर खाल्याने चरबी वाढत नाही.
6 / 8
कोथिंबीरमध्ये जीवनसत्त्व 'सी' असते तसेच जीवनसत्व 'ए' असते. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कोथिंबीर खावी.
7 / 8
कोथिंबीरीमध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेसाठी कोथिंबीर अगदी फायदेशीर ठरते. त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेला गरजेचे असलेले पोषण मिळते.
8 / 8
कोथिंबीर अजिबात कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. त्यामुळे हृदयासाठी ती पोषक ठरते. आहारामध्ये कोथिंबीरीचा समावेश असलाच पाहिजे.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना