Do you want to enjoy the new year? Then say bye bye to these 5 bad habits with 2022
नव्या वर्षात बिंधास्त जगायचं, टेंशनला ठोकायचाय रामराम? मग २०२२ सोबत ५ सवयींनाही म्हणा बाय-बाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 5:34 PM1 / 7१. नवं वर्षांचं स्वागत कसं करायचं, त्यासाठी काय काय करायचं, पार्टी कुठे, ड्रेसिंग कोणतं? अशी सगळी तयारी आता जोरात सुरू असेल.... पण जुन्या वर्षाच्याच सगळ्या चिंता आणि काळजी घेऊन नविन वर्षात प्रवेश करणार का?2 / 7२. नवं वर्ष खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचं असेल तर उगाच डोक्यात वळवळ करणारे काही किडे आताच काढून फेकून द्या आणि काही वाईट सवयींना २०२२ सोबतच बाय बाय म्हणा.. जेणेकरून नव्या वर्षाची एक मस्त फ्रेश सुरुवात करू शकाल..यासाठी नेमकं काय करायचं ते बघूया..3 / 7३. फिटनेस तर महत्त्वाचा आहेच. पण वजनाची चिंता करत उगाच डोक्याला हात लावून बसू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटलॉस हे एवढं एकच टार्गेट न ठेवता फिटनेस- हेल्थ असा उद्देश ठेवा. हे दोन्ही साध्य झालं तर वजन आपोआपच मनासारखं कमी होणारचं.. यासाठी मनानेच प्रयोग करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. 4 / 7४. हसणं विसरू नका.. काम, जबाबदारी यांच्या ओझ्याखाली दबून गेलेले अनेक लोक हसणं विसरून जातात. असं मुळीच करू नका. कितीही जबाबदारीचं ओझं असलं तरी छोट्या छोट्या विनोदांवर दिलखुलास हसा.. हसण्यामुळे आपोआपच पॉझिटीव्ह वाईब्स शरीरभर पसरत जातात आणि रिफ्रेश होण्यास मदत होते.5 / 7५. मन, शरीर रिफ्रेश होण्यासाठी पुरेशी झोपही गरजेची आहेच. रात्री अनेकजणांना चटकन झोप लागत नाही. मग मोबाईल किंवा इतर स्क्रिन बघण्यात वेळ जातो. ही सवय सगळ्यात आधी सोडून द्या. शांत झोप येत नसेल तर तळपायांना कोमट तेलाने मालिश करा. लवकर झोप लागेल आणि ती ही शांत.6 / 7६. अगदी जवळ जायचं असेल तरी आपण गाडी घेऊन जातो. या सवयीलाही आताच बाय बाय करा. जवळच्या जवळ जाण्यासाठी गाडी नकोच. त्याऐवजी पायी जाण्याची सवय लावा. फिटनेस आणि पर्यावरण दोन्हींसाठीही उत्तम.7 / 7७. आजवर स्वत:ला वेळ देणं झालंच नसेल तर आता द्या. काही गोष्टी, काही छंद पुर्ण करायचे राहिले असतील तर आता करा. त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना आताच बाय- बाय करून टाका.. आणखी वाचा Subscribe to Notifications