शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दूधासोबत अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; पोटात विष होण्याचीच शक्यता जास्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 2:29 PM

1 / 6
दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक असते. हे जरी खरे असले तरी काही चुकीच्या पदार्थांसोबत दूध घेतल्यास ते विषारी होण्याची शक्यता जास्त असते. आता हे पदार्थ कोणते ते पाहूयात (Don't eat 5 foods with milk that can damage your health)...
2 / 6
संत्री, मोसंबी अशी आंबट फळं दूधासोबत अजिबात खाऊ नयेत. याचा पचनक्रियेवर ताण येतो आणि पचनक्रिया बिघण्याचीच शक्यता जास्त असते.
3 / 6
दूध आणि ब्रेड किंवा दूध आणि टोस्ट असे कॉम्बिनेशन बरेच जण खातात पण ते चुकीचे आहे. ब्रेडमध्ये असणारे यीस्ट आणि दूध हे दोन्ही घटक एकमेकांशी पूरक नसतात.
4 / 6
केळं दूधात घालून त्याचे शिकरणे करण्याची पद्धत आहे. पण हे करणे चुकीचे आहे. या कॉम्बिनेशनमुळे कफ होण्याची शक्यता जास्त असते.
5 / 6
कलिंगड किंवा खरबूज हे केळासोबत कधीच खाऊ नये. यामुळे पचनाशी निगडीत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
6 / 6
मुळ्यासारख्या कंद असलेल्या भाज्या दूधासोबत कधीच खाऊ नयेत. हे दोन्ही एकत्र केल्यास पचनक्रियेवर त्याचा विपरीत परीणाम होतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाmilkदूध