Dr. shriram nene explains 6 signs that shows you need to detox your body, how to detox body?
डॉ. श्रीराम नेने सांगतात जिभेवर ताबा ठेवा, बॉडी डिटॉक्स करायला सांगणारी ५ लक्षणं ओळखा कारण.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 3:01 PM1 / 9कधी कधी आपण गरजेपेक्षा जास्त खातो. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत तर असं हमखास होतं. यामुळे मग शरीरात विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात. ते शरीराच्या बाहेर पडणं अतिशय गरजेचं असतं. यालाच बॉडी डिटॉक्स करणं असं म्हणतात. 2 / 9अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्याच्या सोशल मिडियावर याविषयीची माहिती शेअर केली असून यामध्ये त्यांनी आता बॉडी डिटॉक्स करण्याची वेळ आली आहे, हे कसं ओळखावं, हे सांगणारी काही लक्षणं सांगितली आहेत. तुम्हालाही तसा काही त्रास होत असेल तर एखादा दिवस बॉडी डिटॉक्स करा. (6 signs that shows you need to detox your body)3 / 9बॉडी डिटॉक्स करणं म्हणजे पोटाला आराम देणं. त्या दिवशी फक्त फळं किंवा ताक प्यावं. घरी तयार केलेले फळांचे रसही तुम्ही साखर न टाकता घेऊ शकता. बॉडी डिटॉक्स करताना पातळ पदार्थ खाण्यावर भर दिला जातो.4 / 9डॉ. नेने सांगतात जर तुम्हाला पुर्ण झोप घेऊनही थकवा येत असेल, झोप येत असेल तर बॉडी डिटॉक्स करा, हे सांगणारं ते पहिलं लक्षण आहे. (health tips by Dr. Shriram Nene)5 / 9दुसरं लक्षण म्हणजे मन एकाग्र न होणे.6 / 9शरीरात विषारी पदार्थ साचत चालले आहेत हे सांगणारं तिसरं लक्षण म्हणजे सतत अपचन, ॲसिडीटी, पोट फुगणे, गॅसेस असा त्रास होणे.7 / 9चाैथं लक्षण तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येतं. चेहऱ्यावर ॲक्ने, पिगमेंटेशन येतात. तसेच तुमचा वर्ण किंवा त्वचाही डल, निस्तेज दिसू लागते.8 / 9सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एकदा बॉडी डिटॉक्स करून पाहा. 9 / 9सारखं मुडस्विंग होणं, चिडचिडेपणा वाढणं हे देखील बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे, हे सांगणारं एक लक्षण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications