शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त १० मिनिटांत होणारे बिनापाकाचे तिळाचे लाडू, चवदार लाडूंची झटपट होणारी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 4:18 PM

1 / 8
पाक करून तिळाचे लाडू करणं हे जरा टेन्शनचंच काम आहे. कारण पाक सैल झाला, घट्ट झाला तरी लाडू बिघडतात. असे लाडू कधी खूपच वातड होतात तर अगदी अगदीच कडक. (makar sankranti special)
2 / 8
म्हणूनच पाक बनवायची कटकटच नसणारी ही एक अतिशय सोपी रेसिपी बघा. शिवाय या रेसिपीने केलेला तिळाचा लाडू मुळीच बिघडणार नाही. आणि बिघडला तरी त्याला दुरुस्त करणंही अगदीच सोपं आहे.(Easiest recipe of making sesame ladoo)
3 / 8
बिनापाकाचे तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला १ वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, १ वाटी किसलेला गूळ आणि अर्धी वाटी तूप एवढं साहित्य लागणार आहे.
4 / 8
सगळ्यात आधी तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या.
5 / 8
यानंतर तीळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड होऊ द्या. शेंगदाण्याची टरफलं काढून टाका.
6 / 8
आता मिक्सरच्या भांड्यात तीळ, शेंगदाणे, गूळ टाका आणि मिक्सरमधून वाटून घ्या.
7 / 8
हे मिश्रण आता एका भांड्यात काढा. त्यामध्ये हळूहळू गरम केलेलं तूप टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
8 / 8
या मिश्रणाचे आता छानपैकी लाडू वळा. हे मिश्रण खूप कोरडं झालं आहे, लाडू वळणं जमत नाहीये, असं वाटलं तर त्यात पुन्हा थोडं गरम तूप टाका. किंवा तुपाचं प्रमाण जास्त होऊन मिश्रण सैलसर झालं तर त्यात पुन्हा तिळाचा थोडा कूट करून टाका.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.RecipeपाककृतीMakar Sankrantiमकर संक्रांती