शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अचानक पाहुणे येणार- नाश्त्याला काय करावं सुचत नाही? झटपट करा ५ पदार्थ- तारीफ करुन पाहुणे थकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 2:56 PM

1 / 7
दिवाळी नुकतीच झाली आहे. सध्या मुलांच्या सुट्याही सुरू आहेत. त्यामुळे अनेक जण बाहेरगावी नातलगांकडे भेटीगाठीसाठी जातात. असंच जर तुमच्याही घरी अचानक पाहूणे नाश्त्यासाठी येणार असतील तर ऐनवेळी त्यांच्यासाठी काय मेन्यू करावा, ते कळत नाही.
2 / 7
कारण हातात खूपच कमी वेळ असतो आणि तेवढ्या वेळातच आपल्याला काहीतरी छान बेत करण्याची इच्छा असते. असं कधी तुमच्या बाबतीत झालंच तर हे काही पदार्थ बघून ठेवा. हे पदार्थ खूप पटकन करणं होतात, शिवाय ते एवढे चवदार असतात की खाणारेही तृप्त होऊन जातात.
3 / 7
पहिला पदार्थ म्हणजे मिसळपाव. हल्ली मोड आलेली मटकी दुकानांमध्ये, भाजीवाल्याकडे अगदी सहज मिळते. त्यामुळे मटकी, फरसान, पाव हे साहित्य विकत आणले की अगदी कमीतकमी वेळात चटकदार मिसळ करता येते.
4 / 7
दुसरा पदार्थ म्हणजे इडली चटणी किंवा इडली सांबार. इडलीचं पीठ विकत आणा आणि घरी गरमागरम सांबार आणि चटणी करा. इडली सांबार हा मेन्यू नेहमीच सगळ्यांना आवडतो.
5 / 7
पाहुण्यांच्या नाश्त्याला झटपट करता येण्यासाठी आणखी एक मेन्यू म्हणजे पराठे. घरात ज्या कोणत्या भाज्या आहेत त्या किसून घ्या आणि त्यात पीठ मळा. दही पराठा हा मेन्यू अगदी झटपट होणारा आहे.
6 / 7
कांद्याचे गरमागरम थालिपीठ आणि दही किंवा लोणचं हा देखील एक छान आणि पौष्टिक मेन्यू होऊ शकतो.
7 / 7
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले सॅण्डविचदेखील अतिशय झटपट होते. शिवाय भरपूर चीज घालून, बटर- मेयोनिज लावून केलेले गरमागरम सॅण्डविच सगळ्यांनाच आवडते.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Recipeपाककृती