शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलं ऐकतच नाही-चारचौघात हट्ट करतात? १ सोपी ट्रिक वापरा-शांत होतील मुलं, सगळं ऐकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 8:53 PM

1 / 7
घराचं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी मुलांची महत्वाची भूमिका असते. मुलं जर चांगली वागली तर पूर्ण घर आनंदी राहतं. मुलांना मारल्यामुळे किंवा ओरडल्यामुळे ते अधिकच चिडचिड करतात. मुलांच्या मनात नकारात्मक भावना येतात. काही सोप्या पॅरेंटीग टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. (Parenting Tips)
2 / 7
तुमची मुलं जर उलट बोलत असतील किंवा नकारात्मक उत्तरं येत असतील तर हे वागणं अजिबात चांगले नाही. यामुले मुलं ताण-तणावाखाली जाऊ शकतात. सगळ्यात आधी आपल्या वागण्यात बदल करा. त्यानंतर मुलांच्या वागण्यात आपोआप बदल होईल.
3 / 7
युनिसेफच्या रिपोर्टनुसार आपल्या मुलांशी बोलण्याासाठी कमीत कमी २० मिनिटांचा वेळ नक्की काढा. घरातलं असं कोणतंही काम नाही की जे करताना तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढू शकत नाही आई वडीलांनी आपल्या मुलांशी बोलायला वेळ काढायला हवा.
4 / 7
मुलांनी कोणतंही चांगलं काम केल्यानंतर त्याचं कौतुक करायला विसरू नका. ज्यामुळे मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो.
5 / 7
आई वडिलमुलांसाठी खूप खास असतात मुलांनी एखादी गोष्ट केल्यानंतर आई वडीलांनी त्यांचे कौतुक करायला हवे. ज्यामुळे मुलं शांत आणि आनंद राहतील
6 / 7
जर मुलं कोणत्याही गोष्टीवरून रागवत असतील तर आईवडीलांनी त्यांना रागवण्यापेक्षा शांतपणे बोलायला हवं आणि त्यांना प्रेमाने समजावून सांगा. ज्यामुळे मुलांना आनंद होईल आणि मुलं आपल्या आवडीची गोष्टी करतील.
7 / 7
मुलांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा त्यांना प्रेमाने समजावून सांगा. सगळ्यात आधी तुम्ही हे करा त्यानंतर मुलांकडून अपेक्षा करा.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्व