शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरीच करा विकतसारखी परफेक्ट पांढरीशुभ्र आवळा कँडी, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 4:17 PM

1 / 7
आवळा प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच विविध समस्यांसाठी उपयुक्त असे फळ आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाजारात येणारा आवळा आवर्जून खाल्ला जातो. यातही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण आवडीने खात असलेली गोष्ट म्हणजे आवळा कँडी (Easy Perfect Amla Candy Recipe).
2 / 7
चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा थंडीच्या काळात आवर्जून खायला हवा. हल्ली बरेच जण आवळा कँडी विकत घेतात. मात्र घरी बनवायला अतिशय सोपी असलेली ही कँडी झटपट पद्धतीने कशी करायची ते पाहूया...
3 / 7
मोठ्या आकाराचे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर ते एका भांड्यात घेऊन कुकरला शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत.
4 / 7
शिजवल्यानंतर आवळ्याच्या आपोआप फोडी होतात. यातील बिया काढून टाकून फोडी वेगळ्या कराव्यात आणि त्या थंड होऊ द्याव्यात.
5 / 7
या फोडींमध्ये अर्धा किलो साखर घालावी. साखर घातलेले हे आवळे ३ दिवस तसेच ठेवावेत. त्याला चांगला पाक सुटतो आणि तोच पाक या फोडींमध्ये चांगला मुरतोही. मात्र दिवसातून २ वेळा हे मिश्रण हलवून पाहायचे.
6 / 7
पाकातून काढून हा आवळा एका ताटात घ्यावा. ताटातच काही दिवसांत सावलीने हा आवळा सुकतो. उन्हामध्ये सुकवल्यास तो चिवट होतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आवळ्याला पाणी लागणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी.
7 / 7
उरलेला पाक आपण सरबत करण्यासाठी वापरु शकतो. कोरडी झालेली आवळा कँडी एका हवाबंद डब्यात भरुन ठेवावी. जाता येता तोंडात टाकण्यासाठी हा अतिशय उत्तम आणि उपयुक्त पर्याय असतो.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.