शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सब्जा उन्हाळ्यात शरीराला देतो थंडावा! खा प्या आणि चेहऱ्यालाही लावा सब्जा फेसपॅक, गारेगार जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 10:17 IST

1 / 8
उन्हाळ्यामध्ये सब्जा घातलेले पाणी आपण पितो. तसेच सरबतांमध्ये सब्जा घालतो. इतरही पदार्थांमध्ये सब्जा घालतो. उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणे शरीरासाठी फार फायद्याचे ठरते.
2 / 8
सब्जा फक्त खाण्यासाठीच वापरा जात नाही. विविध ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार करताना त्यामध्ये सब्जा वापरला जातो. कारण सब्जामध्ये विविध गुणधर्म असतात.
3 / 8
सब्जामध्ये ओमेगा-३ असते. शरीरासाठी ते फार गरजेचे असते. तसेच सब्ज्यामध्ये फारबरही चांगल्या प्रमाणात असते. त्यामध्ये कॅल्शियम असते. इतरही अनेक पोषकतत्वे असतात.
4 / 8
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम सब्जा करतो. तसेच पचनासाठी सब्जा फार उपयुक्त ठरतो. वजन कमी करण्यासाठी मदत करतो.
5 / 8
एवढंच नाही तर त्वचेसाठी सब्जा फार पोषक असतो. सब्ज्यामध्ये अनेक असे गुणधर्म असतात जे त्वचा छान चमकवतो. त्यामुळे त्वचेसाठी सध्या व्हायरल एक फेस मास्क आहे जो लोकांना फार आवडला आहे.
6 / 8
रात्रभर सब्जा भिजत घालायचा. सकाळी मस्त फुलून दुप्पट झालेला सब्जा मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता. त्यामध्ये थोडी साय घाला तसेच दूध घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या.
7 / 8
तयार केलेली पेस्ट चेहर्‍याला लावा. छान मसाज करा. तासभर ठेवा. मग गार पाण्याने धुऊन टाका. चेहरा छान दिसेल.
8 / 8
चेहर्‍यावरील टॅनिंग कमी होईल. तसेच काही डाग असतील तर ते ही कमी होतील. पिंपल्स जर सारखे येत असतील तर त्याचे प्रमाणही कमी होईल.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीHealth Tipsहेल्थ टिप्स