शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असे एक फळ, रोज खा आणि भरपूर जगा! बारा महिने खावे- आनंदाने जगावे असा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 18:57 IST

1 / 9
उन्हाळ्यामध्ये विविध फळे खाल्लीच पाहिजेत. मात्र एक असे फळ आहे जे बाराही महिने मिळते आणि ते फळ खाणे शरीरासाठी फार फायद्याचे ठरते.
2 / 9
असे हे फळ म्हणजे अंजीर. आपण सुकामेवा खातो. त्यामध्ये अंजीर असतेच. मात्र त्या अंजीरापेक्षा अंजीराचे ताजे फळ खाणे जास्त फायद्याचे ठरते.
3 / 9
रोज एक अंजीर खाल्ले तर पोटाचे त्रास उद्भवणार नाहीत. अंजीरामुळे पोट अगदी व्यवस्थित साफ होते. ज्यांना पोटाचे त्रास असतील त्यांनी तर अंजीर खायलाच हवे.
4 / 9
काहींना शौचास नीट होत नाही. तसे गंभीर कारण काहीच नसते. तरी पोट साफ होत नाही रोज एक अंजीर खाल्ल्याने ही समस्या अगदी नाहीशी होईल.
5 / 9
अंजीरामध्ये भरपूर पोटॅशिअम असते. तसेच मॅग्नेशिअमही भरपूर असते. हृदयाच्या आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अंजीर खाणे हृदयासाठीही चांगले असते.
6 / 9
अंजीरामध्ये फॅट्स अगदी कमी असतात. तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे अंजीराने पोट भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी अंजीर फायद्याचे ठरते.
7 / 9
अंजीर हा अँण्टी ऑक्सिडंट्सचा फार चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे अंजीर खाल्याने त्वचा फार छान सुंदर राहते. चेहरा उजळतो.
8 / 9
अंजीरात जीवनसत्त्व 'के' असते. तसेच कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडे चांगली मजबूत ठेवण्यासाठी अंजीर खाणे उपयुक्त ठरते.
9 / 9
अंजीरामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणार्‍यांना अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे