शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सतत चष्मा लावणं नको वाटतं? रोज हे ५ पदार्थ खा; चष्म्याचा नंबर कमी होईल-तेज होईल नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 10:10 AM

1 / 6
रोज फोन वापरल्यामुळे लॅपटॉपवर तासनतास काम केल्यामुळे अनेकांचे डोळे कमकुवत झाले आहेत. ऐन तारूण्यात चश्मा लागल्यानंतर डोळ्यांवरही परिणाम होतो. डोळे चांगले ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या रोजच्या सेवनाने गंभीर आजारांपासून बचाव होतो ते समजून घेऊ.(How to Get Rid Of Spectacles Permanently)
2 / 6
संत्री, लिंबू यांसारखी आंबट फळं व्हिटामीन सी युक्त असतात. ज्यामुळे शरीरातील कोलोजन लेव्हल चांगली राहते. जे कॉर्नियासाठी गरजेचे असते. व्हिटामीन सी मोतिबिंदू रोखण्यास मदत करते.
3 / 6
स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लुबेरी डोळ्यांसाठी एक सूपरफुड आहे. या फळांमधील एंटीऑक्सिडेंट्स डोळ्ंयासाठी उत्तम ठरतात. ब्लड प्रेशर कमी होणं, डोळ्यांना ब्लर दिसणं यांसारख्या समस्यांपासून दूर होण्यास मदत होते.
4 / 6
पोटॅशिम डोळयांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. खासकरून डोळे कोरडे पडत असतील तर केळ्याचे सेवन केल्यानं डोळे चांगले राहण्यास मदत होते.
5 / 6
आंबा आणि पपई यात खास एंटीऑक्सिडेंट्स असतात. ल्यूटिन आणि जेक्सॅथिन असते. जे सनब्लॉकप्रमाणे काम करते. ज्यामुळे नजर तीक्ष्ण होण्यास मदत होते.
6 / 6
जर्दाळूमध्ये डोळ्यांसाठी पोषक ठरणारी काही तत्व असतात. यात व्हिटामीन ए, सी आणि ई, कॅरोटीनॉयड्स असतात यात बीटा कॅरोटीनही असते. बीटा कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारते आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासही मदत होते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स