शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयशॅडो न वापरता डोळ्यांचा करा सुंदर मेकअप, खास बिगिनर्ससाठी ४ सोप्या टिप्स, डोळे दिसतील टपोरे- सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 4:23 PM

1 / 6
१. खूप मेकअप करण्याची सवय नसेल आणि त्यात डोळ्यांचा मेकअप करायला भीती वाटत असेल तर खास बिगिनर्स साठी दिल्या गेलेल्या या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकतील... यामध्ये आपण आयशॅडो न वापरता डोळ्यांचा आकर्षक पद्धतीने कसा मेकअप करायचा, ते पाहूया.
2 / 6
२. सगळ्यात आधी तर डोळ्यांच्या वरच्या भागावर ब्रशने कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्या.
3 / 6
३. त्यानंतर ब्लशचा वापर करा. यासाठी डोळे उघडे ठेवा आणि आयब्रोच्या खालचा जो भाग आहे, तिथे हलक्या हाताने ब्लश लावा. ब्लश नसेल तर लिपस्टिकच्या शेडचाही वापर करू शकता.
4 / 6
४. यानंतर आयलायनर लावा. बिगिनर्स असाल, डोळ्यांचा मेकअप करण्याची फारशी सवय नसेल तर ब्राऊन किंवा ग्रे रंगाचे आय लायनर वापरा. ते ही पेन्सिल आयलायनर लावा. आवडत असेल तर एक लहानसा ब्रश वापरून तो आयलायनरवर फिरवा आणि डोळ्यांना स्मोकी लूक द्या.
5 / 6
५. त्यानंतर तुमच्या आवडीचे कोणतेही हायलायटर घ्या. ते डोळ्यांच्या वर मध्यभागी थोडेसे पसरून लावा. तसेच डोळ्याच्या खालच्या बाजूनेही मध्यभागी लावा.
6 / 6
६. सगळ्यात शेवटी मस्कारा लावला की झाला तुमचा आय- मेकअप. हा मेकअप कोणत्याही आऊटफिटवर छानच दिसतो. अगदी रोज ऑफिससाठीही तुम्ही असा मेकअप करू शकता.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सeye care tipsडोळ्यांची निगाMakeup Tipsमेकअप टिप्स