शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dupatta Draping Style: लेहेंगा, पंजाबी सूटवर ओढणी कशी घ्यावी समजतंच नाही? टॉप १० लूक्स, अशी करा स्टाईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 4:26 PM

1 / 10
१. लेहेंगा, पंजाबी सूट, अनारकली सूट किंवा वनपीस घातला की त्यावर ओढणी कशी घ्यावी, हे बऱ्याचदा कळतंच नाही. ड्रेसवरचे वर्क झाकले जाणार नाही आणि ओढणीची पण कलाकुसर दिसून येईल, अशा स्टाईलिश पद्धतीने ओढणी ड्रेपिंग कसं करावं, हेच सांगणाऱ्या या काही टिप्स..
2 / 10
२. तुमचा ड्रेस कितीही छान असला तरी तुम्ही ओढणी कशी घेताय, यावर तुमचा लूक अवलंबून असतो. त्यामुळे ओढणीची खास स्टाईल जमलीच पाहिजे. ड्रेसवरचे काम, तुमचा मेकअप यावरून ओढणी कशी घ्यावी हे ठरवले जाते.
3 / 10
३. सोनम कपूरची ही अनोखी स्टाईल बघा.. ही ओढणी ड्रेपिंग स्टाईल सध्या ट्रेडींग आहे. यामुळे ड्रेसचा समोरचा भाग पुर्णपणे दिसून येतो. जर तुमच्या ड्रेसवर खूप हेवी वर्क असेल तर अशा पद्धतीने ओढणी एकदा ट्राय करून बघा.
4 / 10
४. लेहेंग्यावर ओढणी घेण्याचा हा आणखी एक लोकप्रिय प्रकार. पण ब्लाऊज तर हेवी वर्कचे असेल आणि ओढणीच्या काठांपेक्षा आतला भागच अधिक आकर्षक असेल, तर या पद्धतीने तुम्ही ओढणी घेऊ शकता.
5 / 10
५. आजकाल साडीला जसा बेल्ट लावून पदर पिनअप केला जातो, तशीच स्टाईल आता लेहेंगा, घागरा यामध्येही दिसून येते. अशा पद्धतीने ओढणी घ्यायची असेल तर एका बाजूला छोट्याशा प्लेट घेऊन पिनअप करा. पदराचे एक टोक घेऊन ते मागच्या बाजूने आणा आणि दुसऱ्या खांद्यावर पिनअप करा. यामुळे पुढून घागऱ्याचे वर्क आणि मागच्या बाजूने ओढणीचे वर्क तसेच काठ पुर्णपणे दिसून येतात.
6 / 10
६. ओढणी खूप काही देखणी नसेल तर अशा पद्धतीची स्टाईल करता येते. मागच्या बाजूने ओढणी घेऊन हाताच्या कोपऱ्यातून पुढे काढायची. कॅरी करायलाही ही स्टाईल अगदी सोपी आहे.
7 / 10
७. अशा पद्धतीने एका खांद्यावर ओढणी पिनअप करायची आणि नंतर पुढच्या बाजूनेच ती वळवून दुसऱ्या हातावर घ्यायची, अशी स्टाईलही सध्या खूप इन आहे. जर ड्रेसपेक्षा ओढणीचे वर्क आणि रंग अधिक उठावदार असेल, तर अशी स्टाईल करावी.
8 / 10
८. अशा पद्धतीने घेतलेली ओढणीही नक्कीच आकर्षक दिसेल. नेट ओढणीसाठी ही स्टाईल अधिक सुट होते.
9 / 10
९. पंजाबी ड्रेसवर कशी ओढणी घ्यावी, हे समजत नसेल तर काजोलचा हा लूक अतिशय छान आणि आकर्षक आहे.
10 / 10
१०. ओढणीचे काठ अधिक आकर्षक असतील तर ओढणी ड्रेपिंगची अशी स्टाईल छान शोभून दिसेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशनmarriageलग्न