शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वजन कमी करून अमृता खानविलकरसारखं फिट व्हायचं? मग करून पाहा ती रोज करते त्या ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 5:20 PM

1 / 7
मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकर हिने तिचा फिटनेस मंत्र नुकताच तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर केला आहे.
2 / 7
यामध्ये अमृताने ती वेटलॉससाठी तसेच फिटनेससाठी दररोज खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते, याविषयीची माहिती दिली आहे.
3 / 7
यामध्ये अमृताने सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती दररोज ३ ते ४ लीटर पाणी पिते. यामुळे आरोग्याला खूप आश्चर्यकारक फायदे होतात, असं ती सांगते.
4 / 7
दुसरं म्हणजे ती दररोज ग्रीन ज्यूस घेते. यामध्ये काकडी, सेलेरी, पालक, ग्रीन ॲपल, आलं असं सगळं टाकलेलं असतं. सगळ्यात आधी पालक थोडा उकळून घ्यायचा. आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ घालून त्याचा ज्सूस करायचा.
5 / 7
जेवणानंतर ती बडिशेप आणि जिरे घालून उकळलेलं पाणी पिते. यामुळे पचनाला मदत होऊन वजन कमी होण्यास फायदा होतो. हे पाणी पिऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केली तरी चालेल, असंही ती म्हणते आहे.
6 / 7
रोज सकाळी उठल्यानंतर अमृता ब्लॅक कॉफीमध्ये तूप टाकून घेते. ती म्हणते की गुड फॅट्सने तुमच्या दिवसाची सुरुवात झाली तर ते आरोग्यासाठी चांगलेच असते. यानंतर दिवसातून दोन वेळा ती ब्लॅक कॉफी घेते. कारण ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.
7 / 7
प्रत्येकाला खाण्यापिण्यात काय सहन होईल, याचे प्रमाण वेगवेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करून पाहा, पण शरीराला जे झेपेल तेच करा. कोणतीही गोष्ट खूप जास्त करू नका. आणि आरोग्यासाठी जे काही कराल ते एन्जॉय करा.. असा सल्लाही अमृताने दिला आहे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सAmrita Khanvilkarअमृता खानविलकर