शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 8:00 AM

1 / 6
१. दीपिका पदुकोनचा फिटनेस, तिचं दिसणं, बॉडी लॅंग्वेज या सगळ्या गोष्टी तिला सहज मिळालेल्या नाहीत. त्या मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ती दररोज मेहनत घेते. आपल्याला वर्कआऊटचा कंटाळा येतो. थोडे दिवस केलं की खंड पडतो. पण दिपिकाचं तसं नाही. रोजचं वर्कआऊट सेशन पुर्ण केल्याशिवाय तिला अजिबातच चैन पडत नाही. फिटनेस टिकविण्यासाठी आणि फिगर मेंटेन करण्यासाठी दीपिका नेमकं काय करते, ते बघाच..
2 / 6
२. पिलेट्स Pilates हा दीपिकाचा आवडीचा व्यायाम प्रकार. या प्रकारातलं लेंथनिंग, स्ट्रेंथनिंग तिला खूप आवडतं. त्यामुळेच ती बऱ्याचदा तिच्या फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांच्यासोबत पिलेट्स वर्कआऊट करताना दिसते. दिपिकाचं शरीर पिलेट्स व्यायामासाठी अतिशय परफेक्ट असून ती हा व्यायाम मनापासून एन्जॉय करते. या व्यायामातला बेसिक प्रकार असो किंवा मग चॅलेंजिंग. दिपिका तेवढ्याच उत्साहाने संपूर्ण व्यायाम करते, असं यास्मिन तिच्याबद्दल सांगतात.
3 / 6
३. नुसताच व्यायाम करून उपयोग नाही. फिटनेस राखायचा तर तुमचं डाएटही परफेक्ट हवं. वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं म्हणून एखादा पदार्थ मुळीच खायचा नाही, असं काही दीपिकाच्या डाएटमध्ये नसतं. खाण्याच्या आणि वजन कंट्रोल करण्याच्या बाबतीत ती खरोखरंच smart eater आहे. ती जवळपास सगळेच हेल्दी पदार्थ खाते. दर २ तासांनी ती खाते आणि ते देखील खाऊन अतिपोट भरणार नाही एवढंच. 'Never eat with your eyes, eat enough to fill your stomach and never overeat' हा तिचा खाण्याच्या बाबतीतला नियम आहे.
4 / 6
४. व्यायामाच कंटाळा येऊ नये किंवा तेच ते वर्कआऊट बोअर होऊ नये म्हणून दीपिका तिच्या वर्कआऊट सेशनमध्ये कायम काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करत असते. वेगवेगळे वर्कआऊट प्रकार शिकून ते करून बघायला तिला जाम आवडतं. यामुळे व्यायामातला इंटरेस्ट टिकून रहायला नक्कीच मदत होते. साधारणपणे सुरुवातीला वार्मअपसाठी लाईट रनिंग, त्यानंतर हाय इंटेन्सिटी वर्कआऊट आणि त्यानंतर स्ट्रेचिंग असं तिच्या व्यायामाचं सेशन असतं.
5 / 6
५. सातत्य हा दीपिकाच्या वर्कआऊटचा एक मुख्य भाग. नेमकं इथेच बरेच जण कमी पडतात आणि मग फिटनेसचं सगळं गणितच हुकत जातं. तिच्या व्यायामात सहसा खंड पडत नाहीच. कितीही बिझी असली तरी कमीतकमी १० मिनिटांचा वेळ काढून ट्रेडमिलवर वॉकिंग करणं, एवढं तरी ती हमखास करतेच.
6 / 6
६. स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआऊट करण्यावर दीपिकाचा भर असतो. यामुळे शरीरातील अधिकाधिक कॅलरी बर्न होण्यास मदत होते. मेटाबॉलिझम रेट म्हणजेच शरीरातील चयापचय क्रिया अधिक चांगली होते. एन्झायटीचा त्रास कमी होतो. jujutsu martial art हा प्रकार येणारे खूपच कमी लोक इंडस्ट्रीमध्ये असून दीपिका त्यापैकीच एक आहे.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सDeepika Padukoneदीपिका पादुकोणExerciseव्यायाम