शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हातापायांच्या काड्या पण पोट सुटले? ५ व्यायाम घरीच करा, फिगर होईल परफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 3:38 PM

1 / 7
पोट बाहेर येणं (Belly Fat) ही सध्या सर्वाधिक लोकांमध्ये उद्भवणारी कॉमन समस्या आहे. ज्याचे शरीर बारीक असते पण त्यांचं पोट सुटल्यानं ते जास्त जाड दिसून येतात. पोटाची चरबी वाढल्यानं कपड्यांची फिटिंग व्यवस्थित बसत नाही. याशिवाय आत्मविश्वासही कमी होतो. अन्हेल्दी डाएट, झोपेची कमतरता, जीवनशैली चुकीची असणं, यामुळे पोट सुटतं. सोपे व्यायाम करून तुम्ही (Exercises) वजन कमी करू शकता. (How to loss weight)
2 / 7
हे सोपे व्यायाम करण्यासाठी तुम्हाली जीम किंवा योगा क्लासेसला जाण्याची काही गरज नाही. घरच्याघरी कोणत्याही इक्विपमेंटशिवाय तुम्ही हे व्यायाम करू शकता.
3 / 7
सकाळी अर्धा तास कार्डीओ व्यायाम करायला हवा. रोज ५ ते ३० मिनिटं व्यायाम केल्यास शरीरात चांगला परिणाम दिसून येतो. कार्डिओ आणि एरोबिक्स वजन कमी करण्यास मदत करते. कार्डिओ व्यायामात धावणे, वेगानं चालणे, जंपिग, सायकलिंगचा समावेश होतो.
4 / 7
हा व्यायाम करताना बेली फॅट आणि एब्सवर दबाव येतो. २० रिपिटेशन्सचे २ सेट्स करा यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात.
5 / 7
बेली फॅट कमी करण्यासाठी हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. सगळ्यात आधी एक मॅटवर झोपा मग हातांना शरीराच्या दोन्ही बाजूंनी पसरवा आणि पाय हवेत उचला. ९० डिग्रीमध्ये पाय ठेवा. या व्यायामाचे १५ रिपेटेशन्स आणि ३ सेट्स करा,
6 / 7
सिट अप्स करण्यासाठी मॅटवर बसा. मग फोटो दाखवल्याप्रमाणे १२ रिपेटेशन्स करून २ सेट्स करा. सिट अप्समुळे बेली फॅट कमी झाल्याचं दिसून येतं.
7 / 7
प्लँक्समुळे कोअर स्ट्रेथ वाढते आणि पोटाची चरबीसुद्धा कमी होते. हा व्यायाम करताना मॅटवर झोपून शरीर वर उचला १ मिनिटं असंच राहून पुन्हा सामान्य स्थितीत या.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य