शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पारंपरिक पौष्टिक पदार्थांच्या ६ जोड्या; रोज १ जोडी आहारात हवीच-जेवण मस्त-वजन कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 4:23 PM

1 / 6
वरण भात: वजन कमी करण्यासाठी वरण भात हा उत्तम पर्याय आहे. वरण भातातून कर्बोदकं, प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात. वरण भातासोबत थोडं दही आणि सॅलड खाल्ल्यास चांगले फॅट्स, प्रथिनं, फायबर आणि खनिजंही मिळतात. हे अशा प्रकारचं फूड काॅम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. वरण भात खाताना त्यावर आठवणीनं साजूक तूप घ्यावं.
2 / 6
इडली सांबार : वजन कमी करण्यासाठी इडली सांबार हा दक्षिण भारतीय पदार्थही फायदेशीर आहे. इडली सांबार पचण्यास हलका असून ते खाल्ल्यानं लवकर पोट भरतं. इडली सांबारात उष्मांकही कमी असतात. इडली सांबारप्रमाणेच सांबार सोबत डोसा किंवा उत्तप्पाही खाता येतो.
3 / 6
राजमा भात: पोषणासोबत वजन घटवण्यासाठी महत्वाचा पदार्थ म्हणजे राजमा भात जो राजमा चावल म्हणूनच ओळखला जातो. राजमा भातात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. राजमा भाताच ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. राजमा भात खाल्ल्यानं लवकर भूक लागत नाही. यात असलेल्या फायबरमुळे बध्दकोष्ठता होत नाही. पचन सुधारतं, शरीरातील कोलेस्टेराॅल कमी होतं. राजमा भातात फॅट्स आणि उष्मांक कमी असतात. यात असलेल्या पोषण घटकांमुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
4 / 6
दही पोहे- पोहे धुवून मऊ करुन त्यात दही घालून भिजवले जातात. वरुन तुपाची किंवा तेलाची फोडणी करुन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि हिंग घालून ती दही मिसळलेल्या पोह्यांवर टाकली जाते. असे हे चविष्ट दही पोहे आरोग्यास फायदेशीरही आहे. यात उष्मांक कमी असतात. जीवनसत्वं, ॲण्टिऑक्सिडण्ट्स, फायबर आणि लोहाचं प्रमाण भरपूर अस्तं. दही पोह्यात आरोग्यदायी फॅट्स, प्रथिनं असतात. वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
5 / 6
भाजी पोळी: भाजी पोळी हा आहारातील महत्वाचा घटक. भाजी पोळीत पोषण जास्त आणि उष्मांक कमी असतात. पोळीसोबत विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्यानं शरीराला जीवनसत्व, कर्बोदकं, फायबर, खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्स मिळतात. भाजी पोळी आरोग्यासाठी पोषक असून वजन कमी करण्यासाठी असरदार असते.
6 / 6
तूप खिचडी किंवा दही खिचडी: खिचडी हे सूपरफूड असून समाधान देणारा पौष्टिक पदार्थ आहे. खिचडी ही तूप टाकून खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. खिचडी आणखी पोष्टिक करायची झाल्यास त्यात विविध भाज्या घालाव्यात. भाज्या घातलेल्या खिचडीतून फायबर आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्सही मिळतात. खिचडी सोबत दही खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीरास आरोग्यदायी फॅट्स मिळतात.
टॅग्स :foodअन्नWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthy Diet Planआहार योजना