Foods For Vitamin B-12 : What To Eat For Vitamin B-12 Best Foods For Vitamib B-12
हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:29 AM1 / 8रोजच्या आहारात व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचे सेवन केल्यानं शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. व्हिटामीन बी-१२ साठी नेहमीच नॉनव्हेज खायला हवे असं काही नाही आहारात काही शाकाहारी पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढू शकता. ( What To Eat For Vitamin B-12 Best Foods For Vitamin B-12)2 / 8शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा येणं, अशक्तपणा, झोप न लागणं अशा समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा.3 / 8सोया प्रोडक्ट्समधून व्हिटामीन-१२ मिळते. आहारात सोयाबीन, सोया मिल्क अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.4 / 8दूध किंवा दह्याचे सेवन करा. दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही.5 / 8ओट्सच्या सेवनाने व्हिटामीन बी-१२ कमतरता दूर होण्यास मदत होते. मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा.6 / 8फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. फळांचे सेवन केल्याने व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.7 / 8बीटरूटच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. बीटरूट पराठा, बीटाचा ज्यूस या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.8 / 8 पालक, केल, कडधान्य या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा. आणखी वाचा Subscribe to Notifications