शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हेल्दी पदार्थ खाऊनही पोट सुटतच चाललंय? फायबरयुक्त खा ६ पदार्थ; वजन घटेल - पोटही होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 3:46 PM

1 / 9
वेट लॉससाठी (Fitness) आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे (Fibre rich foods). जर आपण व्यायाम करून डाएटकडे दुर्लक्ष करत असाल तर, वेट लॉस योग्य पद्धतीने होणार नाही (Weight loss tips). जर वेट लॉस करायचं असेल तर, फक्त हेल्दी फूड खाऊ नका, फायबरयुक्त पदार्थ खा(Foods high in fiber: Boost your health with fiber-rich foods helps for weight loss).
2 / 9
फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने फक्त वजन कमी होत नाही तर, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दूर होतात.
3 / 9
फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. यासह मधुमेहग्रस्त रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. वेट लॉससाठी कोणते फायबरयुक्त पदार्थ खावेत? पाहूयात.
4 / 9
असे म्हणतात केळी खाल्ल्याने वजन वाढते. पण असं अजिबात नाही. केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही, उलट पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. आपण नियमित एक किंवा दोन केळी खाऊ शकता.
5 / 9
वजन कमी करण्याच्या आहारात गाजराचाही समावेश केला जातो. गाजरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यासह त्यात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 5 आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. गाजर डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते.
6 / 9
बेरी केवळ फायबरचा उत्तम स्त्रोत नसून, त्यात अँटी-ऑक्सिडंट्सचेही प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी यांना आहारात समावेश करा.
7 / 9
आयर्न आणि फायबरने समृद्ध बीटरूट आरोग्यास निरोगी ठेवते. आपण नियमितही बीटरूट खाऊ शकता. बीटरूट रक्त वाढविण्यापासून वजन कमी करण्यास मदत करते. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.
8 / 9
हिरव्या वाटाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यात प्रोटीनही असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यासह शारीरात उर्जाही टिकून राहते.
9 / 9
वेट लॉससाठी सॅलड खाण्याचा सल्ला मिळतो. सॅलडमध्ये काकडी असतेच. काकडीमध्ये जास्त पाणी आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते. आपण नियमित काकडी खाऊ शकता.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स