ऑफिससाठी फॉर्मल लूक देणारं ब्लाऊज शिवायचंय? ७ सुंदर 'नेक डिझाईन्स'- दिसाल स्टायलिश, आकर्षक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 3:17 PM
1 / 8 ऑफिसमध्ये साडी नेसायची असेल तर ब्लाऊज अशा पद्धतीने शिवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला परफेक्ट फॉर्मल लूक मिळेल. यासाठीच ब्लाऊजचे डिझाईन्स नेमके कसे घ्यायचे ते पाहा... 2 / 8 असं स्टॅण्ड कॉलरचं ब्लाऊज ऑफिससाठी एकदम शोभून दिसतं. याच्या बाह्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 3 / 8 स्टॅण्ड कॉलर प्रकारात अशा पद्धतीचं समोरच्या बटनांचं ब्लाऊजही शिवून पाहा. 4 / 8 असं कॉलरचं ब्लाऊज शिवण्याचीही हल्ली खूप फॅशन आहे. असं एखादं ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असू द्या. 5 / 8 जास्त डिप नसलेला व्ही शेप नेकदेखील फॉर्मल लूकसाठी छान वाटतो. 6 / 8 कॉटनची साडी असेल तर असं बंद गळ्याचं बोट नेक ब्लाऊज शोभून दिसतं. 7 / 8 बोट नेक न घेता असं पूर्ण बंद गळ्याचं ब्लाऊज शिवण्याचाही सध्या खूप ट्रेण्ड आहे. 8 / 8 स्टॅण्ड कॉलर नेक आणि समोरच्या बाजूने छोटासा व्ही कट असं ब्लाऊजही फॉर्मल लूकसाठी चांगलं आहे. आणखी वाचा