शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिझेरिअननंतरही उत्तम फिटनेस सांभाळणाऱ्या ७ अभिनेत्री; त्या सांगतात सिझरविषयीचे गैरसमजच जास्त कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 2:41 PM

1 / 8
1. गरोदर राहणाऱ्या प्रत्येकीला अगदी पहिल्या महिन्यापासून वेगवेगळे सल्ले दिले जातात. यातले अनेक सल्ले बाळंतपण नॉर्मल होण्यासाठी काय करावं, याविषयीचे असतात. सिझेरियनविषयी (Caesarean delivery) अनेक गैरसमज वारंवार ऐकू आल्याने गरोदर महिलांनाही त्याविषयी भीती वाटू लागते. सिझर होणं हे खरोखरंच खूप त्रासदायक आहे, त्यामुळे शरीरावर डाग तसेच राहतात, कंबरदुखी कायमची मागे लागते, एकप्रकारे शरीर अधू झाल्यासारखं होतं.. असं काय काय आपण त्याबाबत ऐकलेलं असतं. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत. नॉर्मल बाळंतपण झालं, तर ते चांगलंच आहे.
2 / 8
2. पण यदाकदाचित सिझर करण्याची वेळ आली तर घाबरून जाऊ नका. या काही बॉलीवूड सेलिब्रिटींनीही सिझरद्वारे बाळांना जन्म दिला आहे आणि खूपच लवकर त्यांनी त्याचं रुटीन अगदी नॉर्मल पद्धतीने सुरू केलं आहे.
3 / 8
3. आलिया भटलाही नुकतीच मुलगी झाली. आलियाचंही सी- सेक्शनच झालं आहे.
4 / 8
4. शिल्पा शेट्टीनेही मुलगा वियान याला सी- सेक्शन पद्धतीनेच जन्म दिला. या बाळंतपणानंतर तिला खूप डिप्रेशन आलं होतं. दुसऱ्या मुलीसाठी मात्र तिने सरोगसीचा पर्याय निवडला.
5 / 8
5. मंदिरा बेदीचंही सिझेरियन झालं होतं. सिझेरियन झाल्यानंतर डॉक्टरांनी ४० दिवसांनी मला माझं पुर्ववत रुटीन सुरू करायला परवानगी दिली, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.
6 / 8
6. तैमूर आणि जेह या दोघांच्या वेळी करिना कपूरचे सिझेरियनच झाले आहे.
7 / 8
7. कोरियोग्राफर फराह खान हिनेही सी- सेक्शन ( C- section) डिलिव्हरीच्या माध्यमातूनच तिळ्या बाळांना जन्म दिला. तिला २ मुली आणि १ मुलगा आहे.
8 / 8
8. अभिनेत्री तसेच विश्वसुंदरी लारा दत्ता हिलाही सी- सेक्शन डिलिव्हरीलाच सामाेरं जावं लागलं होतं.
टॅग्स :Healthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीCelebrityसेलिब्रिटी