शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळ्यात सारखं पाणी- पाणी हाेतं, घशाला कोरड पडते? डिहायड्रेशन टाळण्यासाठी 'ही' फळं खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 11:49 AM

1 / 9
उन्हाळ्यात सारखी तहान लहान लागते. भरपूर पाणी प्यायलं तरी घशाला कोरड पडल्यासारखं वाटतं. डिहायड्रेशनमुळे गळून गेल्यासारखं होतं. त्यामुळे भरपूर पाणी तर प्या पण त्यासोबतच उर्जा देणारी आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणारी काळी फळं आणि भाज्यादेखील खा असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.
2 / 9
ही फळं आणि भाज्या नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ श्रुती भारद्वाज यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना दिली.
3 / 9
यात त्यांनी सांगितलेलं पहिलं फळ आहे टरबूज. त्यामध्ये पाणी आणि फायबर जास्त प्रमाणात असतं. तसेच त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे येणारा थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करतात.
4 / 9
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात. त्यातले काही घटक उन्हाळ्यामुळे त्वचेला होणारा सनबर्नचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात.
5 / 9
व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि पाणी भरपूर प्रमाणात देणारी काकडी उन्हाळ्यात आवर्जून खावी. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
6 / 9
पपईमध्येही पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये पपई खाणे अधिक चांगले.
7 / 9
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारी संत्री, मोसंबी, किवी यासारखी फळं उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात खाल्ल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
8 / 9
डिहायड्रेशन, उष्माघात असा त्रास होऊ नये, म्हणून या दिवसांत अननस खाणेही आरोग्यदायी ठरते.
9 / 9
टरबुजाप्रमाणेच खरबूजही उन्हाळ्यात खायला पाहिजे. त्यातून वॉटर कंटेंट तर जास्त प्रमाणात मिळतोच. पण व्हिटॅमिन ए, सी आणि बी देखील मिळते. शिवाय हृदयाच्या, पोटाच्या आरोग्यासाठीही खरबूज उत्तमअसते.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfruitsफळेvegetableभाज्याSummer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स