शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणपतीच्या पूजेसाठी 'या' वस्तू घेतल्या ना? करा जय्यत तयारी- पूजा करताना धावपळ होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2024 2:20 PM

1 / 6
गणपती स्थापनेच्या पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची जुळवाजुळव करून पूजेची थाळी आधीच तयार करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही...
2 / 6
मखर किंवा सजावटीचे सामान, गणपतीचा पाट, चौरंग, त्यावर टाकायचे वस्त्र, लाईटिंग आणि सजावटीच्या इतर माळा असे सगळे सामान आधीच काढून ठेवा. शक्य झालं तरी सगळी आरास करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी पळापळ होणार नाही.
3 / 6
कलश, पाणी, विड्याची पानं, सुपारी, एक- दोन रुपयांची नाणी, गुळ, खोबरं, पंचामृत, खडीसाखर, दूध, हळद- कुंकू, गुलाल, अक्षदा, धूप किंवा उदबत्ती, काडेपेटी, पळी, संध्यापात्र, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, दोर वाती, फुल वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं साहित्य घालून पुजेची थाळी तयार करून ठेवा.
4 / 6
गणपतीला वाहायला दुर्वा, आघाडा, जास्वंदाची फुलं, वस्त्रमाळा, इतर फुलं, गणपतीला जानवं असं सगळं एका ट्रेमध्ये तयार ठेवा.
5 / 6
गणेशस्थापनेच्या पुजेमध्ये पंचखाद्य आणि खिरापत यांचा विशेष मान असतो. ती आदल्या दिवशीच तयार करून ठेवा.
6 / 6
तसेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या मोदकाच्या सगळ्या सामानाची जुळवाजुळव करून सगळे साहित्य एका ठिकाणी काढून ठेवा. जेणेकरून दुसऱ्यादिवशी सामानाची शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही.
टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Mahotsavगणेशोत्सव