Ganpati Jewellery : Best Ganpati Jewellery options Ganpati Necklace Haar
गणेशोत्सवात आकर्षक, पारंपरिक दागिन्यांनी खुलवा बाप्पाचं रूप; पाहा लेटेस्ट ज्वेलरी डिजाइन्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 8:04 PM1 / 11गणेशोत्सवात बाप्पाला कोणत्या दागिन्यांनी सजवायचं (Ganpati Jewellery) याची लगबग सर्वत्र सुरू असते. 2 / 11कुठे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी, तर कुठे रंगेबेरंगी फुलांनी बाप्पांना सजवलं जातं. या लेखात बाप्पाच्या दागिन्यांचे सहज उपलब्ध होतील असे काही पर्याय पाहूया. (Ganpati Necklace Haar)3 / 11तुम्ही गणपती बाप्पासाठी संपूर्ण गोल्डनं ज्वेलरीचा सेटही बनवून घेऊ शकता किंवा आर्टिफिशियल सेट्सही तुम्हाला बाजरात उपलब्ध होतील.4 / 11तुम्ही गोल्डन ज्वेलरीवर किंवा मोत्यांच्या कंठीवर बाप्पाला दुर्वांचा हार घालू शकता. 5 / 11याशिवाय बाळी, कडे, मोत्यांचे हार, कंगन मुर्तीची शोभा वाढवतील.6 / 11लहान लहान उंदीर मामांच्या मूर्ती तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होतील. गणपतीच्या पुढ्यात अशा मूर्ती ठेवल्यानंतर देखावा अधिकच उठून दिसेल. 7 / 11दुर्वा आणि फुलांचा हार, गणपतीच्या आवडत्या जास्वंदाचा हार तुम्ही घालू शकता. 8 / 11गणेशाच्या मुर्तीसाठी तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा हार घालू शकता. 9 / 11मोत्यांची कंठी किवा मोदकाच्या आकाराची कंठीसुद्धा तुम्ही निवडू शकता.10 / 11संपूर्ण गोल्डन आणि मध्ये लाल खडे असलेले हारही बाप्पाला उठून दिसतील. 11 / 11(Image Credit-Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications