शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 1:06 PM

1 / 7
सध्या बाजारात भरपूर संत्री आलेल्या आहेत. संत्रीमधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे तुम्हीही भरपूर संत्री खा आणि त्याची सालं मात्र झाडांसाठी राखून ठेवा.
2 / 7
संत्रीची सालं झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे त्या सालींचा उपयोग झाडांसाठी कसा करायचा आणि त्याचे झाडांना नेमके काय फायदे होतात, हे आता पाहूया..
3 / 7
संत्रीच्या सालींचा उपयोग झाडांसाठी करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी या साली २२ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी झाडांना द्या. फक्त एवढंच केल्याने झाडांना मात्र ४ जबरदस्त फायदे मिळणार आहेत.
4 / 7
संत्रीच्या सालींमधून झाडांना भरपूर प्रमाणत पोटॅशियम मिळते. ते झाडांच्या वाढीसाठी खूप गरजेचे आहे.
5 / 7
संत्रीच्या सालींमधून मिळणारे नायट्रोजन आणि फॉस्फरस झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी पोषक ठरतात.
6 / 7
झाडांची पानं कायम हिरवीगार आणि चमकदार रहावीत यासाठी संत्रीच्या सालींचे पाणी झाडांवर शिंपडावे.
7 / 7
मातीला किंवा रोपट्याला मुंग्या होत असतील, बारीक किडे दिसत असतील तर संत्रीचे पाणी झाडांवर, मातीवर फवारावे. संत्रीच्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे किडे, मुंग्या कमी होतात.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सTerrace Gardenगच्चीतली बागHome remedyहोम रेमेडी