Gardening Tips : Dry Basil Plant Will Come To Life With Chalk Worth Two Rupess
तुळस सुकली, पानं कमी काड्याच जास्त? २ रूपयांची ही वस्तू मातीत मिसळा, हिरवीगार होईल तुळस By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:42 PM1 / 7सकाळचा चहा असो किंवा सर्दी, खोकल्याचे औषध तुळस प्रत्येक आजारावर गुणकारी मानली जाते. घरात तुळस ठेवल्याने वातावरण चांगले राहते. यात अनेक औषधी गुण असतात ज्यामुळे आजारांपासून लढण्यास मदत होते. हिंदू धर्मात तुळशीला मातेप्रमाणे मानले जाते. 2 / 7आषाशी एकादशीलाही तुळशीचे पुजन केले जाते. तुळशीची पानं चहात सुद्धा घातली जातात. तुळशीचं रोप वातावरण शुद्ध करते. थंडी किंवा पावसाळ्याच्या वातावरणात लोक तुळशीच्या पानांचा काढा बनवूनही पितात.3 / 7आता पावसाळ्याचे वातावरण आहे. अशा स्थितीत तुळशीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची आवश्यकता नसते. तुम्ही दिवसातून एकदा तुळशीला पाणी घालू शकता. जेणेकरून मातीत मॉईश्चर टिकून राहील तुळशीच्या रोपाला काही वेळ ऊन्हात ठेवायला हवं. तुळशीचं रोप सुकलं असेल त्यात जराही जीव नसेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावू शकता.4 / 7तुळशीच्या रोपात जराही जीव नसेल तर तुम्ही ते कापून झाड मोठ्या कुंडीत ट्रांसप्लांट करू शकता. ट्रांसप्लाट करण्याआधी रेती आणि वर्मी कंपोस्ट मिसळून झाडं लावायला विसरू नका. 5 / 7याशिवाय कुंडीतलं पाणी व्यवस्थित ठेवा. जर तुम्ही नवीन रोप लावत असाल तर १० ते १२ दिवसांनी रोपाच्या वरून कात्रीेने सुकलेली, कोमेजलेली पानं काढून घ्या.6 / 7जर तुमच्या अंगणातील तुळसीचं रोप सुकलं अले तर तुम्ही फक्त २ रूपयांचे वापर करून रोपात पुन्हा जीव आणू शकता. यासाठी तुम्हाला एक खडू घ्यावा लागेल. 7 / 7याची पावडर बनवून मातीत मिसळा आणि पाणी घाला. ज्यामुळ रोपाला कॅल्शियम मिळेल आणि रोप पुन्हा जिवंत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications