शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

छोट्या कुंडीतही भरपूर फुलून येणारी ७ रोपं, बघा कमी जागेत भरपूर झाडं लावण्याचा खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 11:39 AM

1 / 9
गार्डनिंगची हौस अनेकांना असते. पण प्रत्येकाकडेच त्यासाठीची मुबलक जागा उपलब्ध असतेच असं नाही.
2 / 9
म्हणूनच ज्यांच्याकडे खूप जागा नाही, पण तरीही कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लावायची आहेत, अशा गार्डनिंग प्रेमींनी ही काही रोपं आवर्जून लावावीत. कारण ही रोपं अगदी लहान कुंडीतही भरपूर फुलून येतात. शिवाय कायम टवटवीत राहतात. त्यामुळे घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी ती निश्चितच उपयोगी ठरतात.
3 / 9
यापैकी पहिलं आहे मनी प्लांट. मनी प्लांटचा कोणताही प्रकार घेतला तरी तो कमी जागेतही छान फुलून येतो.
4 / 9
दुसरं आहे स्पायडर प्लांट. स्पायडर प्लांटलाही तुम्ही खूप छोट्या कुंडीत लावू शकता. हल्ली बाजारात चिनी मातीच्या लहान आकाराच्या बऱ्याच डेकोरेटीव्ह कुंड्या मिळतात. त्या कुंड्यांमध्ये हे झाड छान येतं.
5 / 9
बेबी सनरोज या झाडाला थेट सुर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालतो. सेमी शेडमध्ये हे रोप छान फुलून येतं.
6 / 9
ब्रोकन हर्ट हे रोप इनडोअर तसेच आऊट डोअर वापरासाठी छान आहे.
7 / 9
जेड प्लांटही छोट्याशा कुंडीत छान बहरून येतं. त्याला छान स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशा जागी ठेवावे.
8 / 9
पर्पल हर्ट हे झाड सेमी शेडमध्ये तसेच उन्हात कुठेही ठेवले तरी चालते.
9 / 9
वंडरिंग ज्यू हे झाडदेखील अतिशय सुंदर असून ते इनडोअर- आऊटडोअर असं कुठेही ठेवू शकता.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सTerrace Gardenगच्चीतली बाग