शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 3:29 PM

1 / 7
बऱ्याचदा शिळे अन्न आपण टाकून देतो. पण त्या शिळ्या अन्नपदार्थांचा झाडांसाठी खूप चांगला उपयोग करता येतो.
2 / 7
रोज उरलेले शिळे पदार्थ जर आपण झाडांना घातले, तर त्यातून झाडांना भरपूर पोषण मिळते. नियमितपणे हा उपाय केला तर झाडं एवढी छान बहरून येतील की विकतचे खत आणून घालण्याची गरजच उरणार नाही. ते पदार्थ नेमके कोणते आणि झाडांना कसे घालायचे, ते आता पाहूया
3 / 7
यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे वरण. बऱ्याचदा उरलेलं वरण आपण टाकून देतो. आता इथून पुढे हे वरण झाडांना घालत जा. यासाठी एक वाटी वरण असेल तर ते साधारण दहा वाट्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि थोडं थोडं करून ते पाणी झाडांना घाला.
4 / 7
ताक खूप आंबट झालं तर ते प्यायला जात नाही. असं ताकही झाडांना घालू शकता. एक ग्लास ताक अर्धी बादली पाण्यात मिसळा आणि ते पाणी झाडांना थोडं थोडं द्या.
5 / 7
भात उरला असेल तर भातात थोडं पाणी घाला आणि मिक्सरमधून त्याची अगदी बारीक पातळ प्युरी करून घ्या. एक वाटी भाताची प्युरी असेल तर ती १० ते १५ वाट्या पाणी घेऊन त्यात मिक्स करा आणि ते पाणी झाडांना घाला.
6 / 7
बऱ्याचदा भाज्या, डाळ- तांदूळ धुतल्यानंतरचं पाणी आपण फेकून देतो. किंवा डाळ- तांदूळ, कडधान्ये भिजत घातलेलं पाणी टाकून देतो. तसं न करता हे पाणी झाडांना देत जा.
7 / 7
कांद्याची टरफलं व केळीची सालं आपण फेकून देतो. पण या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजत घाला. ८ ते १० तासानंतर ते पाणी काढून घ्या आणि झाडांना थोडं थोडं घाला. त्यातून झाडांना नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस मिळते.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सFertilizerखतेTerrace Gardenगच्चीतली बाग