Gardening Tips in Marathi : How to Take Care Indoor Plants in Winter
घरातील रोपाला पानंच येतात-एकही फूल येत नाही? 5 टिप्स, फुलच फुलं येतील, थंडीत बहरेल बाल्कनी By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 5:02 PM1 / 7घरात झाडं लावण्याचे अनेक फायदे आहेत.आपलं घर फ्रेश, हवेशीर राहावं यासाठी अनेकजण आपल्या घरात झाडं लावतात. हिवाळ्यात या झाडांची काळजी कशी घ्यावी हा मोठा प्रश्न असतो. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोप्या गार्डनिंग टिप्स लक्षात ठेवल्या तर एकही रोप कोमेजणार नाही याशिवाय फुलांचीही वाढ चांगली होईल. (Winter tips and tricks to take care of house plants)2 / 7 हिवाळ्यात रोपांना जास्तीत जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नसते. या सगळ्या झाडांमध्ये काळानुसार बदल होत असतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कमी पाणी आणि खत घातल्यास झाडं हिरवीगार राहतात.3 / 7थंडीच्या दिवसांत झाडांना जास्तवेळ सूर्यप्रकाशात ठेवा आणि वेळोवेळी पाणी देखील द्या. पण ज्या झाडांना सुर्यप्रकाशाची गरज नाही त्यांना उन्हात ठेवू नका. 4 / 7बाल्कनी आणि घरातील रोपांना वेळेवर खत घाला. जेणेकरून ती झाडे देखील हिरवीगार राहतील आणि सहज वाढू शकतील.5 / 7हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोरड्या खतांचा वापर करू शकता. कारण या वातावरणात माती ओलसर असते. अशावेळी जर तुम्ही ओले खत घातले मातीत तर रोपांचे नुकसान होऊ शकते. 6 / 7केमिकलयुक्त खातांचा वापर करण्यापेक्षा किचनच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा वापर करा. 7 / 7झाडाच्या पानांना आणि फुलांना धुळीपासून वाचवा. सर्व रोपांची वेळोवेळी साफ सफाई करणं गरजेचं आहे. झाडांची कुंडी नेहमी स्वच्छ ठेवावी. यामुळे झाडात किटक येणार नाही आणि झाडं हिरवीगार राहतील. आणखी वाचा Subscribe to Notifications