शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐन तारूण्यात कंबर दुखते-गुडघे खूप ठणकतात? रोज १ डिंकाचा लाडू खा, ५ फायदे- रक्तही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 1:37 PM

1 / 7
डिंकाचे लाडू म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकटी येण्यासाठी डिंकाचे लाडू खाल्ले जातात. ड्रायफ्रुट्स, खोबरं, गूळ, तूप अशा पौष्टीक पदार्थांपासून हे लाडू तयार केले जातात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकते. (Gond Laddu Benefits) डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात पाहूया. (Gond Laddu Benefits in Winter Season)
2 / 7
डिंकाचे लाडू एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण असतात. यात बरीच पोषक तत्व असतात. ज्यामुळे इम्यूनिटी बुस्ट होण्यास मदत होते आणि शरीर जास्तवेळ एनर्जेटिक राहते.
3 / 7
डिंकाच्या लाडूचा आहारात समावेश केल्यास शरीराला वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचवता येते. सर्दी, खोकल्याचे त्रासही कमी होतात.
4 / 7
हिवाळ्याच्या दिवसांत रोज १ डिंकाचा लाडू खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यासही मदत होते. इम्यूनिटी वाढून स्मरणशक्ती चांगली राहण्यासही मदत होते.
5 / 7
प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असा लाडू खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यासही मदत होते. कंबदुखी, पाठदुखी असे त्रास जराही जाणवत नाहीत. फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे गॅसचा त्रास कमी होण्यासाठीही हा लाडू फायदेशीर ठरतो.
6 / 7
बाळंतीण महिलांनी हा लाडू खाल्ल्यास पोषण मिळते त्यांना पाठदुखीपासूनही आराम मिळतो. थकवा दूर होतो, स्तनांमध्ये दूध व्यवस्थित येण्यासही मदत होते.
7 / 7
हृदयाशी संबंधित समस्यांवरही डिंकाचा लाडू गुणकारी ठरतो. यात गुड फॅट्स असतात. याशिवाय प्रोटीन्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक सारख्या हृदयाच्या विकारांचा धोका कमी होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स