शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Guru Purnima 2022 :गुरुपौर्णिमेला खास स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे? घ्या; एकसेएक आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:40 AM

1 / 9
भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान सगळ्यात उच्चतम आणि महत्वपूर्ण आहे. गुरूजणांना वंदन, करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यााचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा (Guru Purnima) गुरूमुळेच आपल्या जीवनाला नवी दिशा मिळते. गुरूमुळेच आपले मार्ग सुकर होतात. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' (Guru Purnima 2022) व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात.
2 / 9
आपला पहिला गुरू म्हणजे आई आईनंतर आपल्या आयुष्यात गुरुरूपात अनेक व्यक्ती येत असतात जे आपल्याला भरभरून शिकवून जातात. या लेखात तुम्हाला गुरूजनांना देण्यासाठी काही खास भेटवस्तू सुचवणार आहोत. (Guru Purnima Gift Ideas)
3 / 9
पुष्प नेहमीच प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या गुरूजनांना पुष्पगुच्छ किंवा एखादं गुलाबाचं फूल देऊन गुरूपौर्णिमा साजरी करू शकता. गुलाबाचे फूल किंव सुंदर अशा फुलांचा गुच्छ भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
4 / 9
डायरी आपण प्रत्येकजण महत्वाच्या नोंदी करून ठेवत असतो. डायरीचा वापर दैनंदिन जीवनातील महत्वाच्या गोष्टी नमूद करून ठेवण्यासाठी केला जातो. तर काहींना नित्य नियमाने डायरी लिहिण्याची सवय असते. म्हणूनच आपल्या गुरुंना भेटवस्तू एक छान डायरी देता येईल.
5 / 9
संपूर्ण जग सध्या डिजिटल साधानांच्या वापरानं आपली रोजची काम पूर्ण करते. म्हणूनच आपल्या गुरुंच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण त्यांना एखादे स्मार्ट बँड गिफ्ट म्हणून देऊ शकता. आज काल ऑनलाईन शॉपिंग साइट आणि बाजारात खूप चांगले स्मार्टबँड मिळतात. आपण आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार स्मार्च वॉचची निवड करू शकता.
6 / 9
प्रत्येक गुरूंना त्यांच्या प्रिय विद्यार्थ्याने अद्वितीय आणि प्रशंसनीय भेटवस्तू दिली तर त्यांचे कौतुक होईल. त्यासाठी हाताने बनवलेल्या वस्तू ही तुमच्या गुरूसाठी सर्वोत्तम भेट असेल. भेटवस्तू बनविण्यावर जो खरा प्रयत्न केला जाईल तो तुमच्या गुरूला सर्वात जास्त आवडेल. तुमच्या गुरूसाठी हाताने बनवलेली चॉकलेट्स ही अशीच एक अप्रतिम भेट असेल.
7 / 9
आदरांजली वाहण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात मिठाईचा बॉक्स भेट देण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. अनादी काळापासून सामाजिक आणि धार्मिक प्रसंगांसाठी ही एक पारंपारिक भेट दिली जाते. मिठाई किंवा मावा बर्फी, काजूकतरी असे कोणतेही गोड पदार्थ तुम्ही गुरूंना भेट म्हणून देऊ शकता.
8 / 9
हाताने बनवलेलं गुरुपौर्णिमेचं ग्रिटींग कार्ड तुम्ही आपल्या आईला किंवा गुरुजणांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. (You-tube)
9 / 9
(Image Credit-www.amazon.in)
टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाShoppingखरेदी