Hair Fall Solution : Ayurvedic Homemade Hair Oil For long Hairs Hair Care Tips
केस गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीक तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 11:40 AM1 / 7केस शरीराचा असा भाग आहेत ज्यामुळे पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो. केसांशिवाय सुंदरतेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. म्हणूनच लोक हेअर केअर रूटीनची काळजी घेतात. अनेकजण केसांवर प्रत्येक आठवड्याला खर्च करतात. 2 / 7केस वाढवण्यासाठी नेहमीच केमिकल्सयुक्त शॅम्पूच लावायला हवेत असं काही नाही काही घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता. आयुर्वेदीक तेल घरच्याघरी कसं बनवायचं याची सोपी पद्धत पाहूया.3 / 7हे तेल बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये 500 ग्रॅम खोबरेल तेल गरम करा, 10 ते 15 पानं नंतर कढीपत्ता, 2 चिरलेले कांदे, मेथी दाणे, 2 चमचे मोहोरी आणि अर्धी वाटी कोरफड जेल घालून चांगले शिजवा. 4 / 7यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. तेल थंड झाल्यावर डब्यात गाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. 5 / 7आठवड्यातून एक किंवा दोनदा रात्री या तेलाने डोक्याला मसाज करा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस चांगले धुवा. 6 / 7यामुळे तुमचे केस पांढरे होणार नाहीत आणि गळणार नाहीत आणि केसांची लांबी चांगली राहील.केसांची चांगली वाढ होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जसं की हिटींग टुल्सचा जास्त वापर करू नये.7 / 7केस धुण्यासाठी केमिकल्सयुक्त शॅम्पूचा वापर न करता शिकेकाई शॅम्पू वापरावा. केसांच्या समस्या टाळण्यासाठी केस ३ ते ४ दिवसांनी धुवायची सवय ठेवा. धुण्याआधी केसाना तेल लावायला विसरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications