शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हनुमान जयंती स्पेशल: मारुतीला दाखवा लाडवांचा नैवेद्य, करा ८ प्रकारचे लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 12:33 PM

1 / 9
हनुमान जयंतीला हनुमानाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये साधारणपणे लाडू करण्याची रीत आहे. प्रसाद म्हणून द्यायला सोपे आणि कमी वेळात होणारा हा गोडाचा पदार्थ (Hanuman Jayanti Special Different Patterns of laddu ).
2 / 9
हनुमानाला बुंदी किंवा मोतीचुराचे लाडू जास्त आवडतात अशी समजूत असल्याने या दिवशी आवर्जून मोतीचूर किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. हे लाडू आपण घरीही सहज करु शकतो.
3 / 9
याशिवाय बेसनाचे लाडू घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडत असल्याने आपण नैवेद्यासाठी हे लाडू करु शकतो.
4 / 9
रवा नारळ किंवा नुसते नारळाचे, खोबऱ्याचे लाडूही झटपट होणारा आणि अतिशय चविष्ट असा प्रकार आहे.
5 / 9
नाचणीचे लाडू हा लाडवांचा आणखी एक पौष्टीक प्रकार असून. नाचणीच्या पीठापासून केले जाणारे हे लाडू लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळेच खाऊ शकतात.
6 / 9
पौष्टीक लाडू म्हणजेच सुकामेवा आणि गव्हाचे पीठ यांपासून केलेले लाडूही अतिशय उत्तम. देवाला नैवेद्य दाखवण्याच्या निमित्ताने प्रसाद म्हणून आपल्याही पोटात हे लाडू जातात.
7 / 9
चुरमा लाडू हा भरपूर तूपात केला जाणारा गुजराती आणि राजस्थानी प्रकार. या लाडूंची रेसिपी परफेक्ट जमत असेल तर ते खायलाही अतिशय चविष्ट लागतात.
8 / 9
शेवेचे लाडू हा पूर्वी जत्रेच्या ठिकाणी मिळणारा प्रकार. बेसनाची शेव करुन त्याचे लाडू केले की ते खायला तर छान लागतातच पण करायलाही सोपे असतात.
9 / 9
अशाचप्रकारे झटपट होणारे चुरमुऱ्याचेही लाडू अतिशय छान होतात. गुळाचा पाक करुन त्यात चुरमुरे घालून त्याचे लाडू वळले की झटपट हे लाडू तयार...
टॅग्स :foodअन्नHanuman Jayantiहनुमान जयंती