शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हनुमान जयंती : मंदिरासमोर काढता येईल ८ सुंदर रांगोळ्या, काढायला सोप्या आणि दिसतात सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 17:06 IST

1 / 10
हनुमान जयंती संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हनुमान जयंती (Hanuman Jayanti Special Rangolis) निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरात उत्सव साजरा केला जातो.
2 / 10
कोणत्याही प्रकारचा उत्सव म्हटला की रांगोळी आलीच. यंदा तुमच्याही घराजवळील मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जात असेल, तर या खास प्रसंगी शोभून दिसेल अशा काही आकर्षक रांगोळी डिझाईन्स पाहूयात.
3 / 10
१. तुम्ही अशा प्रकारे रांगोळीत हनुमानाची गदा दाखवून त्याभोवती वेगवेगळ्या डिझाईन्सची रांगोळी काढू शकता.
4 / 10
२. रांगोळीत हलकीशी नाजूक डिझाईन्स काढून तुम्ही त्यात जय हनुमान असे लिहून रांगोळी अधिक आकर्षक करु शकता.
5 / 10
३. रांगोळी नसेल तर तुम्ही नागवेलीची पानं आणि गुलाबाच्या पाकळ्या तसेच रंगीबेरंगी फुलांच्या मदतीने देखील अशी सुंदर रांगोळी काढू शकता.
6 / 10
४. मारुतीस्त्रोत्रातील श्लोक रांगोळीत लिहून तुम्ही रांगोळी अधिक सुंदर आणि आकर्षक करु शकता.
7 / 10
५. जर तुमच्याकडे रांगोळी काढायला मोठी जागा असेल तर तुम्ही अशा प्रकारे जय हनुमान लिहून त्याभोवती मोठी संस्कारभारती रांगोळी काढू शकता.
8 / 10
६. रांगोळीत दिव्यांची सजावट करून अशा प्रकारची गोलाकार वेगवेगळ्या डिझाईन्सची रांगोळी काढू शकता.
9 / 10
७. गोलाकार रांगोळीच्या आत केशरी रंग भरून त्यावर जय हनुमान असे लिहून बाजूने गोपदक काढून सुरेख अशी रांगोळी काढू शकतो.
10 / 10
८. हनुमानाची गदा, शेपूट, टिळा, भगवा झेंडा अशा वेगवेगळ्या गोष्टी रांगोळीत दाखवून सुबक आणि सुरेख अशी रांगोळी काढू शकतो.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHanuman Jayantiहनुमान जयंतीrangoliरांगोळीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण