शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॉक्टर सांगतात डायबिटीस असेल तर पेडिक्युअर नक्की करा- बघा पेडिक्युअर करण्याचे ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 4:21 PM

1 / 8
पेडिक्युअर ही एक सौंदर्यवाढीसाठी केली जाणारी ब्यूटी ट्रिटमेंट आहे असं वाटत असेल तर डॉक्टरांनी दिलेला हा खास सल्ला एकदा वाचलाच पाहिजे.
2 / 8
डायबिटीस आणि पेडिक्युअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी तसा काहीही संबंध नाही, असं वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. उलट डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे पेडिक्युअर केलं पाहिजे असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
3 / 8
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी पेडिक्युअर का करावं, याविषयीचा एक व्हिडिओ डॉक्टरांनी drasrani_india या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पेडिक्युअर हा केवळ एक सौंदर्योपचार नसून आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी ट्रिटमेंट आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
4 / 8
ते म्हणतात की डायबिटीस असणाऱ्या रुग्णांच्या तळपायांना दुखापत होण्याची खूप जास्त भीती असते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पायांची योग्य काळजी घेण्यासाठी नियमितपणे पेडिक्युअर करावं.
5 / 8
पेडिक्युअर केल्याने डेडस्किन निघून जाण्यास मदत होते, नखांची व्यवस्थित स्वच्छता होते, जेणेकरून तळपायांवरचे सगळे बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन कमी होते.
6 / 8
एरवी आपण आपले तळपाय, त्यावरच्या लहानसहान जखमा, फोडं, भेगा यांच्याकडे खूप काळजीपुर्वक पाहात नाही. पण पेडिक्युअरदरम्यान आपल्या तळपायांची विशेष काळजी घेतली जाते. पण त्यासाठी पार्लर आणि तिथे पेडिक्युअरसाठी वापरले जाणारे साहित्य चांगल्या दर्जाचे असावे. स्वच्छतेची काळजी घेतली जावी.
7 / 8
तळपायांना मसाज केल्यास पायांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
8 / 8
पेडिक्युअरच्या माध्यमातून तळपायांना नियमितपणे मसाज झाल्यास स्ट्रेस कमी होण्यास फायदा होतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीdiabetesमधुमेह