शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंटोळ्याची भाजी खाण्याचे ५ फायदे; वजन कंट्रोलमध्ये; सर्दी-खोकल्यावरही गुणकारी पारंपरिक पावसाळी भाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 2:46 PM

1 / 7
तब्येत चांगली राहण्यासाठी आहार चांगला असावा लागतो. आहारात ऋतूनुसार सिजनल भाज्यांचा समावेश केला तर तुम्हाला पोषक तत्व मिळू शकतात. यात कंटोळ्यांच्या भाजीचं नाव सगळ्यात वर आहे. या भाजीत अनेक पोषक तत्व असतात.
2 / 7
ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमरता दूर होते. या भाजीच्या सेवनानं फक्त आजार दूर होत नाहीत तर एक रामबाण औषध म्हणूनही याचे फायदे आहेत. कारल्याप्रमाणे दिसणाऱ्या कंटोळ्यांना 'ककोरा' असंही म्हटलं जातं. पावसाळ्यात ही भाजी खाल्ल्यानं इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
3 / 7
कंटोळ्यांची भाजी पावसाळ्यात होणारं इन्फेक्शन, सिजनल फ्लू पासून दूर ठेवते. ही भाजी खाल्ल्यनं सर्दी, खोकला आणि घश्यातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
4 / 7
कंटोळे शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यात पाण्यासह फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहते. कंटोळ्यांची भाजी इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीही फायदेशीर ठरते.
5 / 7
कंटोल्यांची भाजी ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांसासाठी फायदेशीर ठरते. कंटोल्यांच्या रसाचा आहारात समावेश केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
6 / 7
यात ल्यूटिन असते. जे कॅन्सरसह हृदयाच्या इतर समस्या दूर ठेवण्यासाठी उत्तम असते. हे व्हिटामीन सी चा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि जीवघेणे आजार होण्याचा धोका कमी होतो
7 / 7
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कंटोळ्याची भाजी गुणकारी ठरेल. यात कमी कॅलरीज असतात. याशिवाय फायबर्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स