शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:51 IST

1 / 8
तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
2 / 8
कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकतं. वारंवार तहान लागण्याची कारणं आणि त्या संबंधित आजार याबद्दल जाणून घेऊया...
3 / 8
वारंवार तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण डायबेटीस असू शकतं. जेव्हा शरीरात शुगर लेव्हल जास्त असते तेव्हा किडनीला ते फिल्टर करण्यासाठी जास्त त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि वारंवार तहान लागते.
4 / 8
गरम होणं, जास्त घाम येणं, उलट्या होणं किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते. या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. यामुळे वारंवार तहान लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
5 / 8
जर तुम्ही जास्त मीठ किंवा फास्ट फूड खाल्लं तर वारंवार तहान लागू शकते. शरीराला मीठ संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, जेव्हा सोडियमची लेव्हल जास्त असते तेव्हा व्यक्तीला वारंवार तहान लागते.
6 / 8
जेव्हा ताप किंवा इन्फेक्शन होतो तेव्हा शरीर गरम होतं आणि जास्त पाण्याची गरज भासते. विशेषतः व्हायरल ताप किंवा यूरिन इन्फेक्शनमुळे तहान वाढू शकते.
7 / 8
झोपेचा अभाव आणि मानसिक ताण शरीरातील द्रवपदार्थ संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची इच्छा होऊ शकते. जर तुम्ही या समस्येशी बराच काळ सामना करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
8 / 8
ही एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीर पाणी टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते. जर या प्रकारची समस्या गंभीर वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणी