शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2023 Holi Rangoli Designs : होळीच्या दिवशी दारासमोर पटापट काढता येतील १० सोप्या, आकर्षक रांगोळी डिझाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:11 PM

1 / 11
भारतीय संस्कृतीत कोणत्याही मोठ्या सणांच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते. तर काहीजण रोज नवनवीन रांगोळ्या दारासमोर काढतात. रांगोळी नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेच प्रतिक मानली जाते. होळीच्या (Holi 2023) दिवशी दारासमोर पटकन काढता येतील अशा काही रांगोळी डिजाईन्स पाहूया (Easy Rangoli designs)
2 / 11
माचिसच्या काड्या, चाळणी, बांगड्या, कंगवा वापरून तुम्ही आकर्षक रांगोळ्या काढू शकता.
3 / 11
होळीसाठी रांगोळी काढत असताना तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून धुलविंदनाच्या रंगांप्रमाणे रंगेबिरंगी फिल रांगोळीला येईल.
4 / 11
या छोट्या छोट्या डिजाईन्स तुम्ही दारासमोर किंवा तुळशीच्या बाजूला काढू शकता.
5 / 11
या सुंदर मनमोहक रांगोळी डिजाईन्स काढण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही अगदी कमीत कमी वेळात रांगोळ्या काढून होतील.
6 / 11
आधी खडूच्या साहाय्यानं पिचकारी किंवा लाकडाची होळी, पताका तयार करून तुम्ही त्यात तुम्ही मनासारखे रंग भरू शकता.
7 / 11
भारतभरात या सणाला होलिकादहन केलं जातं. मात्र प्रत्येक प्रांतातील होलिकेची रचना निरनिराळ्या पद्धतीने केली जाते.
8 / 11
महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जातं
9 / 11
होलिकादहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते.
10 / 11
होळीच्या दिवशी छोटी संस्कारभारती रांगोळी काढून तुम्ही त्यावर हॅप्पी होळी किंवा धुळवडीच्या शुभेच्छा असा संदेश लिहू शकता.
11 / 11
रंगेबिरंगी लहान लहान ठिपक्यांच्या रांगोळीची सोपी रचना करून होळी साजरी करू शकता.
टॅग्स :Holiहोळी 2022Social Viralसोशल व्हायरलrangoliरांगोळी