शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डाळ-तांदळात अळ्या झाल्या? ५ सोपे उपाय, धान्याला कधीच कीड लागणार नाही, अळ्याही होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 11:37 AM

1 / 7
डाळी आणि तांदुळाला बऱ्याचदा ओलसर हात लागतात. त्यामुळे मग ओलसरपणामुळे त्यांच्यात किडे- अळ्या होतात. असे अस्वच्छ झालेले डाळ- तांदूळ मग खावेसेही वाटत नाहीत.
2 / 7
म्हणूनच सगळ्यात आधी तर या धान्याला ओला हात लागणार नाही याची काळजी घ्याच, पण त्यासोबतच धान्य भरून ठेवताना हे काही उपायही करा. धान्याला अजिबात किडे, अळ्या होणार नाहीत. वर्षांनुवर्षे धान्य एकदम स्वच्छ राहील.
3 / 7
धान्यामध्ये किडे होत असतील तर त्यामध्ये तेजपान टाकून ठेवा. त्याच्या वासाने धान्यात किडे होत नाहीत. डाळ, तांदूळ, डाळी किंवा पिठांसाठीही हा उपाय करू शकता.
4 / 7
काडेपेटीच्या काड्या धान्यात टाकल्यानेही किडे होत नाही. कारण त्याला असलेला सल्फरचा वास किड्यांना दूर ठेवतो. पण डाळ, तांदूळ यांच्यासारखे धुता येण्यासारखे जे धान्य आहे, त्यासाठीच हा उपाय करावा.
5 / 7
डाळ- तांदुळाला थोडी हळद लावून ठेवल्यानेही धान्यांमध्ये किडे- अळ्या होत नाहीत.
6 / 7
धान्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकून ठेवा. यामुळेही किडे होत नाहीत.
7 / 7
वाळलेल्या लाल मिरच्या धान्यात ठेवल्यानेही धान्य वर्षांनुवर्षे स्वच्छ राहते.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सkitchen tipsकिचन टिप्सHome remedyहोम रेमेडीSocial Viralसोशल व्हायरल