शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केस खूप राठ- कोरडे झाले? ५ आयुर्वेदिक उपाय- केसांवर येईल चमक आणि वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 4:18 PM

1 / 7
केसांना पुरेसं मॉईश्चरायझर, कंडिशनर नाही मिळालं तर केस कोरडे होत जातात. हिवाळ्यात तर डोक्यात कोंडा होणं, केस राठ- कोरडे होणं यासारखा त्रास खूपच वाढत जातो.
2 / 7
केसांच्या या समस्येवर आता काही आयुर्वेदिक उपाय करून पाहा. यामुळे केसांची वाढ तर चांगली होईलच, पण केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस छान चमकदार, सिल्की होण्यास मदत होईल.
3 / 7
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे केसांना तेल लावण्यासाठी नेहमी कोमट तेल वापरावे. यामुळे तेल केसांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होते, डोक्याच्या त्वचेतला रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे केसांची मुळं पक्की होतात, त्यांना व्यवस्थित पोषण मिळते.
4 / 7
केसांसाठी नेहमी हर्बल सॉफ्ट शाम्पू वापरा. हार्ड केमिकल्स असणारे शाम्पू वापरल्याने केस कोरडे होत जातात.
5 / 7
कोरफडीचा गर हा केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक कंडिशनर मानला जातो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांच्या मुळांपासून ते खालच्या लांबीपर्यंत केसांना कोरफडीचा गर लावा. यामुळे केसांवर छान चमक येते आणि केस मऊ- सिल्की होतात.
6 / 7
आठवड्यातून एकदा केसांना इसेंशियल ऑईलने मसाज करणं गरजेचे आहे. यामुळेही केसांमधलं नॅचरल मॉईश्चर टिकून राहण्यास आणि केस चमकदार, सिल्की होण्यास मदत होते. तुमचं आवडीचं इसेंशियल ऑईल खोबरेल तेलात मिसळून तुम्ही ते केसांना लावू शकता.
7 / 7
केस चमकदार व्हावेत, भराभर वाढावेत यासाठी तुमच्या आहारातूनही त्यांना पोषण मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे आहारात ओमेगा ३ फॅटी ॲसिड, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, फॉलिक ॲसिड योग्य प्रमाणात असतील, याकडेही लक्ष द्या.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडीAyurvedic Home Remediesघरगुती उपाय