शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चमकदार त्वचेचं ब्यूटी सिक्रेट- तांदळाच्या पाण्यात ३ पदार्थ टाकून चेहऱ्याला लावा, चेहरा चमकेल-पिगमेंटेशन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 12:26 PM

1 / 6
धूळ, प्रदुषण, ऊन यामुळे तसेच त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्याने त्वचेचा पोत खराब होत जातो.
2 / 6
त्यामुळे त्वचा तर ड्राय- डल होतेच, पण त्वचेवर खूप पिगमेंटेशनही दिसू लागतं. म्हणूनच आता हा त्रास कमी करून चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय smakeup_tips43 या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.
3 / 6
हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पाणी आणि इतर ३ पदार्थ वापरायचे आहेत. सगळ्यात आधी तर २ टेबलस्पून तांदूळ एका वाटीत घ्या आणि २ वेळा पाणी बदलून ते स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी घाला आणि ३ ते ४ तास ती वाटी झाकून ठेवा.
4 / 6
४ तासांनी पाणी गाळून घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून रोज वाॅटर टाका.
5 / 6
रोज वाॅटर टाकल्यानंतर १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही १५ दिवस वापरून शकता.
6 / 6
रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हे पाणी चेहऱ्यावर मारा. रात्रभर तुमच्या त्वचेला छान पोषण मिळेल आणि आठवडाभरातच त्वचेवर खूप छान फरक दिसून येईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी