शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वजन कमी होईना? वारंवार ॲसिडिटी- अपचन होते? गरम पाण्यात चिमूटभर 'हा' पदार्थ टाकून प्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 6:12 PM

1 / 8
वाढलेलं वजन कमी कसं करायचं, हा अनेकांपुढचा प्रश्न असतो. कारण काहीही उपाय केले तरी वजनावर नियंत्रणच मिळवता येत नाही, ही त्यांची अडचण असते.
2 / 8
ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रासही हल्ली अनेकांना होतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल झाला, थोडंफार बाहेरचं खाणं झालं की अनेकांना लगेचच अपचनाचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करायचा, ते आता पाहूया...
3 / 8
वजन कमी करण्यासह ॲसिडिटी, अपचन असे त्रास कमी करायचे असतील तर दररोज सकाळी गरम पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्यावं, असा सल्ला आहारतज्ज्ञ इशांका वाही यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना दिला आहे.
4 / 8
यासाठी पाणी उकळून घ्या. ते एका ग्लासमध्ये ओता आणि त्यात चिमूटभर हिंग टाका. आता हे पाणी कोमट होईपर्यंत तसंच झाकून ठेवा. कोमट झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि मग प्या.
5 / 8
हा उपाय केल्याने अपचन आणि ॲसिडीचा त्रास खूप कमी होईल.
6 / 8
पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगली होऊन वजन कमी होण्यास फायदा होईल. शरीरावर बऱ्याचदा सूज येते. त्यालाच आपण inflammation असं म्हणतो. हा त्रास कमी झाल्याने वजन आपोआपच कमी झाल्यासारखे वाटेल.
7 / 8
वारंवार कफ होत नसेल, सर्दीमुळे नाक बंद होत असेल तरीही हिंग पाणी पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे श्वसनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.
8 / 8
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स