Honeymoon Tips : Most common honeymoon mistakes couples can
Honeymoon Tips : हनिमूनला जाताना चुकूनही करू नका 'या' गोष्टी; नाहीतर दोघांचाही मूड कधी खराब होईल कळणारही नाही By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 2:06 PM1 / 10 लग्नानंतर सगळ्याच जोडप्यांना हनीमूनची आवश्यकता असते. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार पार्टनरसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी हनीमूनचा प्लॅन करतो. आपला पहिला वहिला हनीमून अविस्मरणीय राहावा असं प्रत्येकालाच वाटतं. अनेक कपल्स उत्साहाच्या नादात अशा चुका करतात त्यामुळे दोघांचाही मूड ऑफ होतो तर कधी प्रचंड चिडचिड होते. म्हणून आम्ही तुम्हाला हनीमूनला जाताना कोणत्या गोष्टी टाळायच्या याबाबत सांगणार आहोत. (Honeymoon tips)2 / 10लग्नानंतर हनिमूनना जाणारे बरेच कपल्स तुम्ही पाहिले असतील. पण लग्नाच्या सगळ्या गडबडीत बराच थकवा आलेला असतो. अशावेळी आरामाची गरज असते. म्हणून लग्नानंतर एक आठवडा किंवा किमान ३ ते ४ दिवस आराम करून मग हनीमूनला जा. 3 / 10बरेचजण प्लॅनिंग न करताच फिरायला जातात. अशावेळी गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. जर तुम्ही आधीच हनीमूनचं प्लॅनिंग केलं असेल तर प्रत्येक क्षणाचा चांगला आनंद घेता येईल. अन्यथा प्रवासादरम्यान किंवा हॉटेल बुकिंसाठी येत असलेल्या अडचणी सोडवण्यात तुमचा वेळ निघून जाईल. 4 / 10लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची, खास गोष्ट असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक स्थितीप्रमाणे, आवडीप्रमाणे लग्न किंवा हनीमूनचं प्लॅनिंग करत असतो. त्यामुळे अथवा हनिमूनची तुलना इतरांशी करू नका. अश्यानं तुमच्या पार्टनरच्या भावना दुखावल्या जातील. हनीमूनला तुम्ही कुठे जाताय यापेक्षा किती इन्जॉय करता हे महत्वाचं असतं. 5 / 10 हनिमूनला जाताना तुम्ही जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी तर तुम्हाला एकांत मिळणार नाही. यासाठी हनिमून नेहमी ऑफ सीझनमध्ये ठरवा. ज्यामुळे तुम्हाला जास्त पर्यटक आणि गर्दी कमी मिळेल. अशावेळी तुम्ही झाल पार्टनरसोबत अधिक चांगला वेळ घालवू शकाल. 6 / 10तुम्ही गावी नाही तर हनीमूनला जात आहात हे लक्षात ठेवा. अनेकांना प्रवासाला जाताना भरपूर सामान नेण्याची सवय असते. जेव्हा तुम्ही हनिमूनला जाता तेव्हा तुम्हाला कमीत कमी सामान व्यवस्थित पॅक करून जाण्याची ट्रिक माहीत असायला हवी. प्रवास करताना बहुतेक मुलींना सामान पकडण्याचा कंटाळा येतो. 7 / 10हनिमूनचा प्रत्येक क्षण खूप खास असतो. त्यामुळे एखाद्या शांत, रोमॅंटिक ठिकाणी हनिमूनला जा. 8 / 10शक्यतो जास्तीत जास्त दिवस इन्जॉय करता येईल या दृष्टीनं सुट्ट्यांच प्लॅनिंग करा. 9 / 10फक्त लग्नानंतर हनिमूनला जातात असं काही नाही. तुम्ही दरवर्षी आपल्या एनिव्हर्सरीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग करू शकता. 10 / 10फक्त लग्नानंतर हनिमूनला जातात असं काही नाही. तुम्ही दरवर्षी आपल्या एनिव्हर्सरीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications