शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फुलांवर मावा पडतो, बुरशी लागते? १ उपाय करा, कीड लागणार नाही- फुलांनी बहरेल रोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:39 PM

1 / 7
गुलाबाच्या रंगेबिरंगी फुलांनी गार्डनचे सौंदर्य वाढते आणि घराचे वातावरणही चांगले राहते. प्रत्येकालाच आपल्या अंगणात सुंदर फुलं असावीत असं वाटतं. गुलाबाच्या फुलांची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. (How To Get Rid Of Bugs On Roses Naturally)
2 / 7
वातावरणातील बदल, पोषक तत्वांची कमतरता यामुळे रोपाला किड लागायला सुरूवात होते. फुलांवर चिकटलेले छोटे किडे काढणं खूपच सोपं आहे. यासाठी काही खास ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. ज्यामुळे रोपांवरील किडे सहज निघून जातील.
3 / 7
फुलांच्या कळ्यांना छोटे छोटे मिली बग्स चिपकलेले असतात. अनेक प्रकारचे उपाय केल्यानंतर ते कळ्यांची पाठ सोडत नाहीत. किड्यांपासून बचाव करण्यासाठी chlorpyrifos 15 dp चा वापर करा.
4 / 7
chlorpyrifos 15 dp हातात घ्या आणि त्यात हिरवी पानं, कळ्या आणि फुलं इतर जागांवर शिंपडा. ही पावडर तुम्हाला खतांच्या दुकानात सहज मिळेल. यामुळे किडे मरतील आणि पुन्हा संक्रमणही होणार नाही.
5 / 7
झाडांवर मिली बग्स येण्याचे मुख्य कारण वातावरण आणि ऊन आहे. गुलाबाच्या रोपाला जेव्हा योग्य प्रमाणात ऊन मिळत नाही तेव्हा मिलीबग्सचे आक्रमण होते.
6 / 7
बदलत्या वातावरणात पाऊसामुळे वेगाने मिली बग्स झाडावर वेगाने वाढतात. ऊन पडताच गुलाबाच्या फुलांवरील किडे मरतात. यासाठी झाडांना मिली बग्स आणि छोट्या छोट्या किड्यांपासून वाचवण्यासाठी ८ ते ९ तास ऊन्हाच्या ठिकाणी ठेवा.
7 / 7
ऊन्हाळ्याच्या दिवसांत रोप मोठ्या प्रमाणात सुकतात अशावेळी रोपांना काळजीपूर्वक पाणी घाला.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी