शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी योग्य ‘फोकस लाईट’ कसा निवडाल? ७ सोप्या टिप्स, आकर्षक-उठून दिसेल डेकोरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 3:31 PM

1 / 8
गणेशोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपलाय. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्येमध्ये सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे लायटिंग. लायटिंग आणि फोकस योग्य असतील तर बाप्पाचं सौंदर्य अधिक खुलतं आणि डोकोरेशन उठून दिसतं. पण अनेकांना फोकसची निवड कशी करावी हे सुचत नाही. यासाठीच काही सोप्या टिप्स पाहूया. (How do you Choose a Focus for Ganapati Decoration)
2 / 8
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही बाप्पाच्या मागच्या बाजूला फुलाचं किंवा माळाचे डोकोरेशनकेले असेल तर मुर्तीच्या खाली मागच्या बाजूला फोकस लावायला विसरू नका. यामुळे मुर्ती अधिक चांगल्या दिसतील.
3 / 8
जर तुम्ही लहान जागेत डेकोरेशन केले असेल तर वरच्या बाजूने फोकस असायलाच हवा. पांढऱ्या रंगाचा किंवा पिळ्या रंगाचा लाईट जास्त उठून दिसेल.
4 / 8
गणपतीच्या पाटाच्या चारही बाजूंना फोकस लावल्यास सर्व बाजूंनी रोशणाई दिसेल.
5 / 8
जर तुम्ही एकच फोकस लावणार असाल तर रंगेबीरंगी लाईट्स असलेल्या फोकसची निवड करा.
6 / 8
फोकस विकत घेताना वॉरंटी, रिटर्न पॉलिसी सर्व विचारून घ्या ऐनवेळी फोकस व्यवस्थित सुरू होत नसेल तर तुम्हाला बदलून दुसरा घेता येईल.
7 / 8
सकाळच्यावेळी कोणताही एकच लाईटचा फोकस सुरू ठेवा. संध्याकाळनंतर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे फोकस ऑन करू शकता.
8 / 8
२००-३०० रूपयांपासून २ हजारांपर्यंत तुम्हाला हवेतसे फोकस बाजारात उपलब्ध होतील. कमी खर्चात चांगले फोकस घेण्यासाठी आपल्या घराजवळील लायटिंगच्या दुकानात किंवा मोठ्या मार्केट्सना अवश्य भेट द्या.
टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवShoppingखरेदी